No edit permissions for मराठी

TEXT 26

śrotrādīnīndriyāṇy anye
saṁyamāgniṣu juhvati
śabdādīn viṣayān anya
indriyāgniṣu juhvati

श्रोत्र-आदीनि-श्रवणादी प्रक्रिया; इन्द्रियाणि-इंद्रिये; अन्ये-अन्य; संयम-संयचामा; अग्निषु-अग्नीमध्ये; जुह्वति-अर्पण करतात;  शब्द-आदीन्-शब्द आदी; विषयान्-इंद्रियविषय; अन्ये-अन्य; इन्द्रिय-इंद्रियांचे; अग्निषु-अग्नीमध्ये; जुह्वति-अर्पण करतात.

यांपैकी काहीजण (विशुद्ध ब्रह्मचारी) श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियांची, मानसिक संयमरुपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर (नियमन केलेले गृहस्थाश्रमी) इंद्रियविषयांची, इंद्रियाग्नीमध्ये आहुती देतात.

तात्पर्य: ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी या समाजाच्या चार आश्रमांतील सदस्यांनी परिपूर्ण योगी बनणे आवश्यक आहे. मनुष्यजीवन हे पशूप्रमाणे इंद्रियोपभोग करण्यासाठी नाही. म्हणून चार आश्रमांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की, जेणेकरून आध्यात्मिक गुरूच्या देखरेखीखाली असणारे विद्यार्थी, इंद्रियतृप्तीपासून प्रवृत्ती होऊन मन संयमित करतात. ब्रह्मचारी केवळ कृष्णभावनेशी संबंधित असणारे शब्द श्रवण करतो. श्रवण हे ज्ञानाप्राप्तीचे मूलभूत तत्व आहे म्हणून विशुद्ध ब्रह्मचारी पूर्णपणे हरेर्नामानुकीर्तनम् किंवा हरिनाम श्रवणामध्ये आणि कीर्तनामध्ये संलग्न झालेला असतो. तो भौतिक शब्दध्वनीचे श्रवण करण्यापासून  स्वत:ला  परावृत्त करणे आणि हरे कृष्ण हरे कृष्ण या दिव्य शब्द-ध्वनीचे श्रवण करण्यात मग्न होतो. त्याचप्रमाणे मर्यादित आणि नियंत्रित इंद्रियतृप्ती करण्याची मुभा असणारा गृहस्थ अशी कृत्ये महत्प्रयासाने संयमित करतात. लैंगिक जीवन, मादक पदार्थ व मांस भक्षण करणे या समान्यत: मानवसमाजाच्या प्रवृत्त असतात. परंतु एखादा संयमित गृहस्थ अनियंत्रित संभोग आणि इतर प्रकारची इंद्रियतृप्ती करीत नाही. म्हणून धार्मिक जीवनावर आधारित विवाहपद्धती ही सर्व सुधारित मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे. कारण, हाच मैथुनभाग नियंत्रित करण्याचा मार्ग आहे. असे संयमित आणि अनासक्त संभोग जीवन म्हणजे एक प्रकारचा यज्ञच आहे. कारण गृहस्थ आपल्या इंद्रियतृप्ती करण्याच्या प्रवृत्तीची आहुती देतो.

« Previous Next »