No edit permissions for मराठी

TEXT 27

sarvāṇīndriya-karmāṇi
prāṇa-karmāṇi cāpare
ātma-saṁyama-yogāgnau
juhvati jñāna-dīpite

सर्वाणि-सर्व; इन्द्रिय-इंद्रिये; कर्माणि-कार्ये; प्राण-कर्माणि-प्राणाच्या क्रिया; -सुद्धा; अपरे-अन्य; आत्म-संयम-मनोनिग्रह; योग-योग, संधान साधण्याची प्रक्रिया; अग्नौ-अग्नीमध्ये; जुह्वति-अर्पण करतात; ज्ञान-दीपिते- आत्मसाक्षात्कार प्राप्तीच्या तीव्र इच्छेमुळे.

इतर व्यक्ती, ज्या मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात, त्या इंद्रिये आणि प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रुपाने नियंत्रित मनरुपी अग्नीमध्ये अर्पण करतात.

तात्पर्य: या ठिकाणी पतंजलीप्रणीत योगपद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे. पतंजलीच्या योगसूत्रामध्ये आत्म्याला प्रत्यगात्मा आणि पराग-आत्मा म्हणून संबोधण्यात आले आहे. जोपर्यंत आत्मा इंद्रियोपभोगामध्ये आसक्त आहे तोपर्यंत त्याला पराग-आत्मा म्हणतात; पण जेव्हा आत्मा अशा इंद्रियोपभोगापासून अनासक्त होतो तेव्हा त्याला प्रत्यगात्मा म्हटले जाते. शरीरामध्ये आत्मा हा दहा प्रकारच्या वायूंमध्ये वावरत असतो आणि याचा प्रत्यय श्वसनप्रक्रियेद्वारा येतो. पतंजली योगसूत्र, मनुष्याला शरीरातील प्राणांच्या क्रियांचे नियमन कसे करावे याबद्दल सांगते, जेणेकरून शरीरातील सर्व प्रकारच्या प्राणांच्या क्रिया भौतिक आसक्तीतून आत्म्याचे शुद्धीकरण होण्यासाठी अनुकूल होतील. या योगपद्धतीनुसार प्रत्यगात्मा हेच अंतिम ध्येय आहे. हा प्रत्यगात्मा भौतिक क्रियांमधून निवृत्त केलला असतो. इंद्रिये आणि इंद्रियविषय यांचा परस्पर संबंध येतो. उदाहरणार्थ, कान श्रवण करण्यासाठी, नेत्र पाहण्यासाठी, नासिका वास घेण्यासाठी, जिह्वा चव घेण्यासाठी, हात स्पर्श करण्यासाठी आणि याप्रमाणे ही सर्व इंद्रिये आत्म्याच्या बाहेर क्रियाशील असतात. या क्रियांना ‘प्राणवायूच्या क्रिया’ म्हणतात. अपान वायू अधोगामी आहे, व्यान वायू आकुंचन-प्रसरणाचे कार्य करतो. समान वायू समतोलपणा राखतो, उदान वायू  उर्ध्वगामी आहे. जेव्हा मनुष्य प्रबुद्ध होतो तेव्हा तो आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी या सर्वांचा उपयोग करतो.

« Previous Next »