No edit permissions for मराठी

TEXT 3

sa evāyaṁ mayā te ’dya
yogaḥ proktaḥ purātanaḥ
bhakto ’si me sakhā ceti
rahasyaṁ hy etad uttamam

:-तोच; एव-खचितच; अयम्-हा; मया-माझ्याकडून; ते-तुला; अद्या-आज; योग:- योगज्ञान; प्रोक्ता:- सांगितला; पुरातन:- पुरातन; भक्त:- भक्त; असि-तू आहेस; मे-माझा; सखा-सखा किंवा मित्र; -सुद्धा; इति- म्हणून; रहस्यम्-रहस्य; हि-निश्‍चितच; एतत्-हा; उत्तमम्-दिव्य.

भगवंतांशी असणाऱ्या संबंधीचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे,  कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस.

तात्पर्य: भक्त आणि असुर असे मनुष्यांचे दोन वर्ग आहेत. अर्जुन हा भक्त असल्यामुळे भगवंतांनी त्याला हे दिव्य विज्ञान प्रदान करण्यासाठी निवडले; परंतु असुरांना हे दिव्य रहस्यमय विज्ञान समजणे शक्य नाही. या महान ज्ञानग्रंथाच्या अनेक आवृत्त्या आहेत. त्यापैकी काही भाष्ये भक्तांनी केली आहेत तर काही भाष्ये असुरांनी केली आहेत. भक्तांनी केलेले भाष्य खरे आहे, तर असुरांनी केलेले भाष्य निरर्थक आहे. अर्जुन हा श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्रीभगवान म्हणून स्वीकार करतो आणि अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण करून केलेले कोणतेही भाष्य म्हणजे या महान विज्ञानाप्रीत्यर्थ केलेली वास्तविक भक्तिपूर्ण सेवाच आहे. तरीही आसुरी प्रवृत्तीचे लोक भगवान श्रीकृष्णांचा वास्तविक रूपात स्वीकार करीत नाहीत. याउलट ते श्रीकृष्णांविषयी बनावट रचना करतात आणि साधारण वाचकांना श्रीकृष्णांच्या उपदेशाच्या मार्गापासून दूर नेतात. या ठिकाणी अशा चुकीच्या मार्गाबद्दल एक सूचना आहे. मनुष्याने अर्जुनापासून आलेल्या परंपरेचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा रीतीने श्रीमद्भगवद्गीतेच्या या महान विज्ञानापासून स्वत: लाभान्वित व्हावे.

« Previous Next »