No edit permissions for मराठी

TEXT 9

janma karma ca me divyam
evaṁ yo vetti tattvataḥ
tyaktvā dehaṁ punar janma
naiti mām eti so ’rjuna

 जन्म-जन्म; कर्म-कर्म; - सुद्धा; मे-माझे; दिव्यम्-दिव्य; एवम्-याप्रमाणे; य:-जो; वेत्ति: जाणतो; तत्वत:- तत्वत: किंवा यथार्थरूपाने; त्यक्त्वा-सोडून; देहम्-हा देह; पुन:- पुन्हा; जन्म-जन्म; -कधीच नाही; एति-प्राप्त करतो; माम्-मला; एति-प्राप्त  करतो; स:- तो; अर्जुन-हे अर्जुन.

जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही, तर हे अर्जुना! तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो.

तात्पर्य: भगवंतांच्या आपल्या दिव्य धामातून होणाऱ्या अवतरणाबद्दल यापूर्वीच सहाव्या श्‍लोकामध्ये  वर्णन करण्यात आले आहे. जो भगवंतांच्या जन्माचे सत्य जाणू शकतो तो भौतिक बंधनातून मुक्तच आहे आणि म्हणून वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर तो तात्काळ भगवद्धामात परत जातो. भौतिक बंधनातून जीवाची होणारी  अशी मुक्ती सहजपणे मुळीच साध्य होत नाही. निर्विशेषवादी आणि योगी यांना अतिशय क्लेश सोसल्यानंतरच आणि अनेकानेक जन्मांनंतरच मुक्ती प्राप्त होते. यांनतरही भगवंतांच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची जी मुक्ती त्यंाना प्राप्त होते, ती केवळ आंशिक मुक्ती असते आणि अशा मुक्तीत, भौतिक जगतात पुन्हा परतून येण्याची शक्यता असते. पण भक्ताला, केवळ भगवंतांच्या शरीर आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणल्याने हे शरीर त्याग केल्यानंतर भगवद्धामाची प्राप्ती होते आणि त्याला पुन्हा या भौतिक जगतात परतून येण्याचा धोका नसतो. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की, भगवंतांची अनंत रुपे आणि अनंत अवतार आहेत. अद्वैतमच्युतमनादिमनन्तरुपम्- भगवंत जरी अनंत दिव्य रुपे धारण करीत असले तरी ते श्रीभगवंत अद्वयच आहेत. हे सत्य जरी ज्ञानीजन आणि सांसरिक पंडितांच्या आकलनापलीकडे असले तरी मनुष्याने ते दृढ विश्‍वासाद्वारे जाणून घेतले पाहिजे. वेदांमध्ये (पुरुष बोधिनी उपनिषद्) सांगितल्याप्रमाणे

एको देवो नित्यलीलानुरक्तो भक्तव्यापी हृद्यन्तरात्मा॥

     ‘‘एकच भगवंत आपल्या विशुद्ध भक्ताशी लीलीनुरक्त होण्यासाठी नित्य दिव्य रूपे धारण करण्यात मग्न असतात.’’ य वेदप्रमाणांना स्वत: भगवंतांनी गीतेतील या श्‍लोकामध्ये पुष्टी दिली आहे. जो मनुष्य या सत्याचा वेदांच्या आणि भगवंतांच्या प्रामाण्यपूर्व वचनांच्या आधारावर स्वीकार करतो आणि जो तार्किक तत्वज्ञानामध्ये आपला वेळ दवडीत नाही तो मुक्तीच्या परमोच्च पूर्णावस्थेची प्राप्ती करतो. या सत्याचा केवळ विश्‍वासपूर्वक स्वीकार केल्याने मनुष्य निश्‍चितपणे मुक्तीची प्राप्ती करू शकतो. वास्तविकपणे तत्वमसि हे वैदिक वाक्य या बाबतीत लागू पडते. जो कोणी श्रीकृष्णांनाच परम सत्य म्हणून जाणतो किंवा जो भगवंतांना म्हणतो की ‘‘तुम्हीच परम ब्रह्म स्वयं भगवान आहात.’’ तो निश्‍चितपणे तात्काळ मुक्त होतो आणि यामुळेच त्याचा भगवंतांच्या दिव्य सत्संगामधील प्रवेश निश्‍चित होतो. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, भगवंतांचा असा श्रद्धावान भक्त पूर्णता प्राप्त करतो आणि याची पुष्टी पुढील वैदिक  प्रमाणाद्वारे करण्यात आली आहे.

तमेव विदित्वाति मृत्युमेति नान्य: पन्था विद्यतेऽयनाय।

     ‘‘केवळ भगवंतांना जाणल्याने मनुष्य हा जन्म - मृत्यूपासून होणऱ्या मुक्तीची पूर्णावस्था प्राप्त करू शकतो आणि मुक्ती प्राप्त करण्यासाठी इतर कोणताही मार्ग नाही.’’ (श्‍वेताश्वतरोपनिषद् 3.8) इतर कोणताही पर्याय नाही याचा अर्थ आहे की, जो श्रीकृष्णांना पुरुषोत्तम श्रीभगवान म्हणून जाणीत नाहीत, तो निश्‍चितपणे तमोगुणात आहे आणि त्यामुळे तो मुक्तीची प्राप्ती करू शकत नाही. भगवद्गीतेवर सांसरिक पांडित्याला अनुसरुन भाष्य लिहिणे म्हणजे मधाच्या बाटलीचा केवळ पृष्ठभाग चाटल्याप्रमाणे आहे आणि त्यामुळे मुक्ती प्राप्त करणे अशक्य आहे. असे तार्किक ज्ञानी भौतिक जगतामध्ये अत्यंत महत्वपूर्ण कर्मे करीत असतील, पण यामुळे ते मुक्तीसाठी पात्र होतील असे नाही. अशा अहंकारी सांसरिक विद्वांनाना भगवद्भक्ताची अहैतुकी कृपा होईपर्यंत वाट पाहावी लागेल. म्हणून मनुष्याने श्रद्धा आणि ज्ञानाच्या आधारे कृष्णभावनेचे अनुशीलन करून मुक्ती प्राप्त केली पाहिजे.

« Previous Next »