No edit permissions for मराठी

TEXT 3

jñeyaḥ sa nitya-sannyāsī
yo na dveṣṭi na kāṅkṣati
nirdvandvo hi mahā-bāho
sukhaṁ bandhāt pramucyate

ज्ञेय:-जाणले पाहिजे; स:-तो; नित्य- नित्य; सन्न्यासी-संन्यासी; :- जो; -कधीच नाही; द्वेष्टि-तिरस्कार किंवा द्वेष करतो; -कधीच नाही; काङ्क्षति-आकांक्षा करतो; निर्द्वंन्द्व:-सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त; हि-निश्‍चितच; महा-बाहो-हे महाबाहू  अर्जुना; सुखम्-सुखाने; बन्धात्-बंधनातून; प्रमुच्यते-पूर्णपणे मुक्त होतो.

हे महाबाहो अर्जुना! जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफलांची आकांक्षा करीत नाहीत तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करतो आणि पूर्णपणे मुक्त होतो.

तात्पर्य: जो पूर्णपणे कृष्णभावनाभावित आहे तो नेहमी संन्यासीच असतो, कारण त्याला आपल्या कर्मफलांचा द्वेषही वाटत नाही किंवा आपल्या कर्मफलाची आकांक्षाही नसते. भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये समर्पित असा हा संन्यासी परिपूर्ण ज्ञानी आहे. कारण त्याला श्रीकृष्णांशी संबंधित आपल्या मूळ स्वरुपस्थितीचे ज्ञान झालेले असते. तो पूर्णपणे जाणतो की, श्रीकृष्ण पूर्ण आहेत आणि आपण त्यांचे अंश आहोत. हे ज्ञान परिपूर्ण आहे. कारण ते गुणात्मकदृष्ट्या आणि परिमाणात्मकदृष्ट्या बरोबर आहे. श्रीकृष्णांशी एकरूप होण्याची संकल्पना चुकीची आहे, कारण अंश हा पूर्णाशी कधीच बरोबरी करू शकत नाही. अंश हा गुणात्मकदृष्ट्या एक परंतु परिणामात्मकदृष्ट्या भिन्न आहे. हे ज्ञान योग्य आणि दिव्य असे आहे, कारण अशा ज्ञानामुळे, आकांक्षा आणि शोक करण्यायोग्य काहीच कारण नसल्याने जीव स्वत:मध्येच पूर्णत्व प्राप्त करतो. त्याच्या मनामध्ये द्वंद्व मुळीच नसते, कारण तो जे काही करीत असतो ते सर्व श्रीकृष्णांप्रीत्यर्थच करीत असतो. त्याप्रमाणे द्वंद्वस्थितीतून मुक्त असल्याने तो या पाकृती जगात असूनही मुक्तच असतो.

« Previous Next »