No edit permissions for मराठी

TEXT 4

sāṅkhya-yogau pṛthag bālāḥ
pravadanti na paṇḍitāḥ
ekam apy āsthitaḥ samyag
ubhayor vindate phalam

साङ्ख्य-भौतिक जगताचे विश्‍लेषणात्मक अध्ययन; योगौ-भक्तियुक्त कर्म; पृथक्-भिन्न; बाला:- अल्पज्ञ; प्रवदन्ति-सांगतात; -कधीच नाही; पण्डिता:- पंडिता किंवा ज्ञानीजन; एकम्-एकामध्येच; अपि-जरी; आस्थित:- स्थित झालेला; सम्यक्-संपूर्ण; उभयो:- दोहोंचे; विन्दते-भोग घेतो; फलम्-फळ.

केवळ अज्ञानी लोकच भक्तियोग (कर्मयोग) हा भौतिक जगताच्या विश्‍लेषणात्मक अध्ययनापासून (सांख्ययोग) भिन्न आहे असे म्हणतात. जे लोक वस्तुत: ज्ञानी आहेत ते म्हणतात की, या दोन्ही मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाचे चांगल्या रीतीने जो अनुसरण करतो, त्याला दोन्ही मार्गांचे फळ प्राप्त होते.

तात्पर्य: भौतिक अस्तित्वाचा आत्मा शोधणे हे भौतिक जगताच्या विश्‍लेषणात्मक अध्ययनाचे ध्येय आहे. भौतिक जगताचा आत्मा म्हणजे श्रीविष्णू किंवा परमात्मा होय. भगवद्भक्ती म्हणजेच परमात्म्याची सेवा होय. एका प्रकियेमध्ये वृक्षाच्या मुळाचा शोध घेतला जातो आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाला पाणी घातले जाते. सांख्य तत्वज्ञानाचा वास्तविक अभ्यासक भौतिक जगताचे मूळ म्हणजेच श्रीविष्णूंचा शोध घेतो आणि नंतर परिपूर्ण ज्ञानाने युक्त होऊन भगवत्सेवेमध्ये संलग्न होतो. त्यामुळे तात्विकदृष्ट्या दोन्ही प्रक्रियांमध्ये काहीच फरक नाही, कारण दोन्हीचे ध्येय श्रीविष्णूच आहेत. ज्यांना अंतिम ध्येय ज्ञात नाही तेच म्हणतात की, सांख्य आणि कर्मयोगाचे ध्येय एक नाही; परंतु जो ज्ञानी आहे तो या दोन्ही भिन्न प्रक्रियांचे ध्येय एकच असल्याचे जाणतो.

« Previous Next »