No edit permissions for मराठी

TEXTS 11-12

śucau deśe pratiṣṭhāpya
sthiram āsanam ātmanaḥ
nāty-ucchritaṁ nāti-nīcaṁ
cailājina-kuśottaram

tatraikāgraṁ manaḥ kṛtvā
yata-cittendriya-kriyaḥ
upaviśyāsane yuñjyād
yogam ātma-viśuddhaye

 
शुचौ-पवित्र ; देशे- भूमीवर; प्रतिष्ठापय-स्थापित करून; स्थिरम्-दृढ; आसनम्- आसन; आत्मन:- आपले स्वत:चे; -नाहीअ अति-अति, अधिक; इच्छ्रितम्- उंचावर; -तसेच; अति-अति; नीचम्- खाली; चैल-अजिन-मृदू वस्त्र आणि मृगाचे कातेड; कुश-आणि कुश; तृण अथवा गवत; उत्तरम्-आवरण; तत्र-त्यानंतर; एक-अग्रम्-एकाग्रतेने; मन:-मन; कृत्वा-करून; यत-चित्त-मन संयमित करून; इन्द्रिय-इंद्रिये; क्रिय:- आणि क्रिया; उपविश्य-बसून; आसने-आसनावर; युञ्जात्-अभ्यास केला पाहिजे; योगम्-योगाभ्यास; आत्म-हृदय; विशुद्धये-विशुद्धीसाठी

योगाभ्यासासाठी मनुष्याने एकांतस्थळी जाऊन भूमीवर कुशासन अंथरावे आणि ते मृगचर्म व मृदू वस्त्राने आच्छादित करावे. आसन उंचावरही असू नये किंवा अत्यंत खालीही असू नये तसेच आसन पवित्रस्थळी असावे. त्यानंतर योगी व्यक्तीने आसानावर दृढतापूर्वक बसावे आणि मन,इंद्रिय क्रिया यांचे संयमन करून आणि मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा.

     तात्पर्य: पवित्र स्थान म्हणजेच तीर्थस्थळ होय. भारतामध्ये योगिजन किंवा भगवद्भक्त हे स्वगृहांचा त्याग करतात आणि प्रयाग, मुथुरा, वृंदावन, हृषीकेश आणि हरिद्वारसारख्या पवित्र स्थळी वास करतात. अशा ठिकाणी यमुना आणि गंगा आदी पवित्र नद्या वाहत असल्याने त्या ठिकाणी ते एकांतवासात योगाभ्यास करतात. परंतु पाश्‍चात्य लोकांना हे विशेषकरून नेहमी शक्य होत नाही. मोठमोठ्या शहरांतील तथाकथित योगसंस्था या भौतिक लाभप्राप्ती करण्यामध्ये यशस्वी होत असतील, पण वास्तविक योगाभ्यासासाठी त्या मुळीच योग्य नाहीत. जो आत्मसंयमी नाही आणि ज्याचे मन निश्‍चल नाही तो ध्यान करू शकत नाही. म्हणून बृहन्नारदीय पुराणात सांगण्यात आले आहे की, कलियुगामध्ये (वर्तमान युग) लोक हे अल्पायुषी, आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये मंद आणि विविध चितांनी विचलित असल्यामुळे आध्यात्मिक साक्षात्काराचे उत्तम साधन म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय.

हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम्।
कलौ नास्त्येव नास्त्येव नास्त्येव गतिरन्यथा।

     ‘‘कलह आणि दंभयुक्त या युगामध्ये मुक्तीचे एकमात्र साधन म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय. अन्य कोणतीही गती नाही. अन्य कोणतीही गती नाही. अन्य कोणतीही गती नाही.’’

« Previous Next »