TEXT 17
yuktāhāra-vihārasya
yukta-ceṣṭasya karmasu
yukta-svapnāvabodhasya
yogo bhavati duḥkha-hā
युक्त-नियमित; आहार-भोजन, आहार; विहारस्य-विहार, श्रमपरिहार किंवा करमणूक; युक्त-नियमित; चेष्टस्य-निर्वाहाकरिता कर्म करणारा; कर्मसु-कर्तव्य करण्यामध्ये; युक्त -नियमित; स्वप्न-अवबोधस्य-झोपणे आणि जागरण; योग:- योगाभ्यास; भवति-होतो; दु:खहा-दु:ख परिहारक.
जो मनुष्य आपल्या आहार, निद्रा, विहार किंवा करमणूक आणि कर्म करण्याच्या सवयीत नियमित असतो, तो योगाभ्यासाद्वारे सर्व सांसरिक दु:खांचे निदान करू शकतो.
तात्पर्य: आहार, निद्रा, भय आणि मैथुन या शारीरिक गरजांच्या अतिरेकामुळे योगाभ्यासातील प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो.आहाराचा विचार केल्यास केवळ भगवत् प्रसादाचे सेवन केल्यानेच आहार-नियमन होऊ शकते. भगवद्गीतेनुसार (9.26) भगवान श्रीकृष्णांना भाजीपाला, फूल, अन्नधान्य, दूध इत्यादी अर्पण केले जाते. या प्रकारे कृष्णभावनाभावित मनुष्य हा आपोआपच मनुष्याने ग्रहण करणस अयोग्य असे अन्न किंवा सत्वगुणाविरहित अन्न खाण्याचे टाळतो. निद्रेविषयी सांगावयाचे तर, कृष्णभावनाभावित मनुष्य सतत कृष्णभावनाभावित कर्म करण्यामध्ये दक्ष असतो आणि म्हणून निद्रेत घालविलेला अनावश्यक काळ हा त्याच्यासाठी मोठ्या हानीप्रमाणेच असतो. अव्यर्थ कालत्वम्-कृष्णभावनाभावित मनुष्य हा, भगवत्-सेवेमध्ये युक्त झाल्यावाचून आपला वाया गेलेला एक क्षणही सहन करू शकत नाही. म्हणून तो केवळ अत्यावश्यक आहे तितकेच झोपतो. याबाबतीत त्याचे आदर्श म्हणजे श्रील रूप गोस्वामी आहेत. श्रील रुप गोस्वामी निरंतर कृष्णसेवेमध्ये मग्न राहायचे आणि दोन तासांपेक्षा अधिक कधीच झोपत नसत आणि काही वेळा तर दोन तासही नाही. हरिदास ठाकूर हे आपल्या जपमाळेवर प्रतिदिन तीन लाख वेळा जप केल्यावाचून प्रसादही ग्रहण करीत नसत किंवा झोपतही नसत. कर्माचा विचार केल्यास, कृष्णभावनाभावित मनुष्य हा श्रीकृष्णांशी असंबंधित असे कोणतेही कार्य करीत नाही. म्हणून त्याचे कर्म हे कधीच इंद्रियतृप्तीमुळे कलुषित होत नाही. इंद्रियतृप्तीचा प्रश्नच उद्भवत नसल्यामुळे कृष्णभावनाभावित मनुष्याला फावला वेळ कधीच असत नाही. तो आपले कर्म, वाणी, निद्रा, जागृती आणि इतर सर्व शारीरिक कार्यांमध्ये नियमित असल्याने त्याला कोणतेही भौतिक दु:ख नसते.