No edit permissions for मराठी

TEXT 9

puṇyo gandhaḥ pṛthivyāṁ ca
tejaś cāsmi vibhāvasau
jīvanaṁ sarva-bhūteṣu
tapaś cāsmi tapasviṣu

पुण्य:-मूळ; गन्धः-सुगंध; पृथिव्याम्-पृथ्वीचा; -सुद्धा; तेजः-तेज; -सुद्धा; अस्मि-मी आहे; विभावसौ-अग्नीमधील; जीवनम्-प्राण किंवा जीवन; सर्व-सर्व; भूतेषु-जीवांमधील; तप:-तप; -सुद्धा; अस्मि-मी आहे; तपस्विषु-तपस्व्यांमधील.

पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे, आणि अग्नीमधील उष्णता मी आहे, सर्व जीवांमधील जीवनशक्ती मी आहे आणि सर्व तपस्व्यांचे तप मी आहे.

तात्पर्य: जे विकाररहित असते त्याला पुण्य, अर्थात् मूळ असे म्हणतात. भौतिक जगतातील प्रत्येक वस्तूला विशिष्ट रस किंवा गंध असतो. उदाहरणार्थ वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी किंवा फुलामध्ये रस आणि गंध असतो. निर्दोष, मूळचा गंध जो सर्वत्र व्याप्त झालेला असतो तो गंध म्हणजे श्रीकृष्णच आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीला विशिष्ट अशी मूळ चव असते आणि रसायनांच्या मिश्रणाद्वारे ही चव बदलता येते. म्हणून प्रत्येक वस्तूला मूळ रूपात थोड्याफार प्रमाणामध्ये वास, गंध अथवा चव असते. विभावसु म्हणजे अग्नी होय. अग्नीशिवाय आपण स्वयंपाक करू शकत नाही, कारखाने चालवू शकत नाही इत्यादी आणि हा अग्नी म्हणजे श्रीकृष्ण आहेत. अग्नीमधील उष्णता म्हणजे श्रीकृष्ण आहेत. आयुर्वेदानुसार अपचन हे पोटातील मंदाग्नीमुळे होते. म्हणून पचनक्रियेकरिता देखील अग्नी आवश्यक आहे. यास्तव कृष्णभावनेमध्ये आपल्याला पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि प्रत्येक चेतन तत्व, सर्व रसायने आणि सर्व भौतिक तत्वांचे उगम हे श्रीकृष्ण असल्याची जाणीव होते. मनुष्याचे आयुष्यही श्रीकृष्णांवरच आधारित असते. त्यामुळे श्रीकृष्णांच्या कृपेने मनुष्य आपले आयुष्य वाढवू शकतो. अथवा कमी करू शकतो. म्हणून कृष्णभावना ही प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आहे.

« Previous Next »