No edit permissions for मराठी

TEXT 24

agnir jyotir ahaḥ śuklaḥ
ṣaṇ-māsā uttarāyaṇam
tatra prayātā gacchanti
brahma brahma-vido janāḥ

अग्निः—अग्नी; ज्योतिः-प्रकाशः अहः-दिवसः शुक्लः-शुक्ल पक्ष; षट्-मासाः-सहा महिने; उत्तर-अयनम्-उत्तरायणाचे म्हणजे सूर्य जेव्हा उत्तर दिशेकडे वळतो तेव्हा; तत्र-तेथे; प्रयाता:-जे मरण पावतात; गच्छन्ति-जातात; ब्रह्म-ब्रह्माप्रत; ब्रह्म-विदः-ब्रह्मज्ञानी; जनाः-लोक.

जे परब्रह्माला जाणतात ते, अग्रिदेवतेच्या प्रभावामध्ये, प्रकाशामध्ये, दिवसाच्या शुभक्षणी, शुक्लपक्षामध्ये अथवा सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो, त्या सहा महिन्यांमध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती करतात.

तात्पर्यः जेव्हा अग्नी, प्रकाश, दिवस आणि शुक्लपक्षाचा उल्लेख करण्यात येतो तेव्हा जाणले पाहिजे की, या सर्वांच्या अधिष्ठाता देवता आहेत, ज्या जीवांच्या मार्गक्रमणाची व्यवस्था करतात. मृत्यूसमयी मन हे मनुष्याला नवजीवनाच्या मार्गावर घेऊन जाते. उपर्युक्त काळी जर मनुष्याने, योगायोगाने अथवा पूर्वयोजनेनसार देहत्याग केला तर त्याला निर्विशेष ब्रह्मज्योतीची प्राप्ती होऊ शकते. ज्या योगिजनांनी योगाभ्यासात प्रगती केली आहे ते देहत्याग करण्याकरिता इष्ट स्थळकाळाची व्यवस्था करू शकतात; परंतु या गोष्टी इतरांच्या स्वाधीन नसतात. जर योगायोगाने शुभक्षणी त्यांना मृत्यू आला तर जन्म-मृत्यूच्या चक्रात पुन्हा परतावे लागत नाही, नाहीतर ते परतून येण्याची सर्व दृष्टीने शक्यता आहे. तरीही कृष्णभावनाभावित विशुद्ध भक्ताला पुनरागमनाचे मुळीच भय नसते, मग तो देहत्याग शुभकाळी अथवा अशुभकाळी किंवा योगायोगाने अथवा पूर्वयोजनेनुसार करो.

« Previous Next »