No edit permissions for मराठी

TEXT 25

dhūmo rātris tathā kṛṣṇaḥ
ṣaṇ-māsā dakṣiṇāyanam
tatra cāndramasaṁ jyotir
yogī prāpya nivartate

धूमः--धूर; रात्रिः-रात्र; तथा-तसेच; कृष्णः-कृष्णपक्ष; षट्-मासाः-सहा महिने; दक्षिणअयनम्-जेव्हा सूर्य दक्षिण दिशेकडे वळतो तेव्हा, दक्षिणायन; तत्र-तेथे; चान्द्र-मसम्-चंद्रलोक; ज्योतिः—प्रकाशः योगी-योगी; प्राप्य—प्राप्त झाल्यावर; निवर्तते—परतून येतो.

धूर, रात्र कृष्णपक्ष किंवा दक्षिणायनामध्ये जो योगी मरण पावतो तो चंद्रलोकाची प्राप्ती करतो, परंतु तो पुन्हा परत येतो.

तात्पर्य: श्रीमद्भागवताच्या तिस-या स्कंधामध्ये कपिलमुनी सांगतात की, या भूतलावर जे सकाम कर्म करण्यामध्ये आणि यज्ञ करण्यामध्ये निपुण आहेत, त्यांना मृत्यूनंतर चंद्रलोकाची प्राप्ती होते. असे उन्नत जीव चंद्रावर साधारणपणे १०,००० वर्षे (देवतांच्या गणनेनुसार) वास्तव्य करतात आणि सोमरस पान करून जीवनाचा उपभोग घेतात. कालांतराने ते पृथ्वीवर परत येतात. याचा अर्थ असा होतो की, स्थूल इंद्रियांना दृश्य नसले तरी चंद्रलोकावर असे उच्चतर श्रेणीचे जीव निवास करतात.

« Previous Next »