No edit permissions for मराठी

TEXT 16

ahaṁ kratur ahaṁ yajñaḥ
svadhāham aham auṣadham
mantro ’ham aham evājyam
aham agnir ahaṁ hutam

अहम्-मी; क्रतुः-वैदिक कर्मकांड; अहम्-मी; यज्ञः-स्मृती यज्ञ; स्वधा-तर्पण; अहम्-मी; अहम्-मी; औषधम्—औषध; मन्त्रः-दिव्य मंत्र; अहम्-मी; अहम्-मी; एवनिश्चितच; आज्यम्-तूप; अहम्-मी; अग्निः-अग्नी; अहम्-मी; हुतम्-आहुती.

परंतु मीच कर्मकांड आहे, मीच यज्ञ, पूर्वजांना अर्पण करण्यात येणारे तर्पण, वनौषधी आणि दिव्य मंत्र आहे. तूप, अग्नी आणि आहुतीही मीच आहे.

तात्पर्य: ज्योतिष्टोम नामक वैदिक यज्ञ म्हणजे श्रीकृष्णच आहेत आणि स्मृतीमध्ये सांगितलेला महायज्ञ म्हणजेही श्रीकृष्णच आहेत. पितृलोकाला अर्पण केलेले तर्पण (तुपाच्या रूपातील औषध) किंवा पितृलोकांच्या संतुष्टीप्रीत्यर्थ केलेला यज्ञ म्हणजे श्रीकृष्णच आहेत. या यज्ञांमध्ये जे मंत्रोच्चारण केले जाते ते मंत्रोच्चारण म्हणजे श्रीकृष्णच आहेत. यज्ञामध्ये आहुती देण्याकरिता, दुधापासून तयार केलेले इतर पुष्कळ पदार्थ हे सुद्धा श्रीकृष्णच आहेत. अग्नीसुद्धा श्रीकृष्णच आहेत कारण, अग्नी हा पंचमहाभूतांपैकी एक आहे आणि ही पंचमहाभूते म्हणजे श्रीकृष्णांचीच विभिन्न शक्ती आहे. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, कर्मकांडामध्ये सांगण्यात आलेले सर्व यज्ञ म्हणजे श्रीकृष्णच आहेत. अर्थात, जे कृष्णभक्तीमध्ये युक्त आहेत त्यांनी सर्व वेदोक्त यज्ञ पूर्वीच केले असल्याचे जाणले पाहिजे.

« Previous Next »