No edit permissions for मराठी

TEXT 5

na ca mat-sthāni bhūtāni
paśya me yogam aiśvaram
bhūta-bhṛn na ca bhūta-stho
mamātmā bhūta-bhāvanaḥ

-कधीच नाही;-सुद्धा; मत्स्थानि-माझ्यामध्ये स्थित; भूतानि-संपूर्ण सृष्टी; पश्य-पाहा; मे-माझे; योगम् ऐश्वरम्-अचिंत्य योगशक्ती; भूत-भूत्-सर्व जीवांचे धारण व पोषण करणारा; -कधीच नाही; -सुद्धा; भूत-स्थ:-प्राकृत सृष्टीमध्ये; मम-माझा;आत्मा-आत्मा; भूतभावन:-संपूर्ण सृष्टीचा उगम.

तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग ऐश्वर्य पाहा! जरी सर्व जीवांचा पालनपोषणकर्ता आणि सर्वव्यापी मी आहे तरीसुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगम स्थान आहे.

तात्पर्य: भगवंत सांगतात की, सर्व काही त्यांच्या ठायी स्थित आहे. (मत्स्थानि सर्वांभूतानि) याचा विपरीत अर्थ काढू नये. सृष्टीच्या धारण-पोषणाशी भगवंतांचा प्रत्यक्ष संबंध नसतो. काही वेळा पृथ्वीला खांद्यावर धारण केलेल्या अॅटलासचे चित्र आपण पाहतो, परंतु ती ही महाकाय पृथ्वी धारण केल्यामुळे अॅटलास थकल्यासारखा दिसतो. श्रीकृष्णही अशाच प्रकारे सृष्टी धारण करतात, असे कोणी समजू नये. भगवंत सांगतात, सर्व काही त्यांच्यामध्ये स्थित असले तरी ते या सर्वांपासून अलिप्त आहेत. ग्रहमंडळे आकाशामध्ये तरंगतात आणि हे आकाश म्हणजे भगवंतांची शक्ती आहे; परंतु ते आकाशाहून भिन्न आहेत. भगवंतांचे वेगळे अस्तित्व आहे. म्हणून भगवंत म्हणतात, ते जरी माझ्या अचिंत्य शक्तीमुळे स्थित असले तरी, भगवंत या नात्याने मी त्यांच्यापासून स्वतंत्र आहे. हेच भगवंतांचे अचिंत्य योगैश्वर्य होय.

          'निरुक्ती' या वैदिक शब्दकोशात म्हटले आहे की, युज्यतेऽनेन दुर्घटेषु कार्येषु- ‘‘भगवंत आपल्या शक्तीचे वैभव प्रकट करताना अचिंत्य आणि अद्भुत लीला करतात.’’ त्यांचे व्यक्तित्व विविध शक्तींनी संपत्र आहे आणि त्यांचा निश्चय म्हणजेच वास्तविक प्रत्यक्ष सत्य आहे. अशा रीतीने भगवंतांना जाणले पाहिजे. आपणाला काही तरी करावेसे वाटते; परंतु त्यामध्ये इतक्या अडचणी येतात की, कधी कधी आपल्याला, आपल्या इच्छेनुसार काही करणे शक्य होत नाही. तथापि, जेव्हा श्रीकृष्णांना काही करावेसे वाटते तेव्हा, केवळ त्यांच्या इच्छेने सर्व काही इतक्या उत्तम रीतीने घडून येते की, हे कसे घडले याची कल्पनाही करता येत नाही. भगवंत या वस्तुस्थितीबद्दल सांगतात की, ते जरी संपूर्ण सृष्टीचे धारण, पोषणकर्ता असले तरी, या भौतिक सृष्टीला ते स्पर्शही करीत नाहीत. केवळ त्यांच्या स्वेच्छेने सर्व गोष्टींची निर्मिती, धारण, पोषण आणि संहार होतो. आपल्यामध्ये आणि आपल्या भौतिक मनामध्ये फरक आहे; परंतु त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या मनामध्ये मुळीच फरक नसतो, कारण ते परब्रह्म आहेत. एकाच वेळी भगवंत सर्वत्र उपस्थित आहेत, तरीही भगवंतांना स्वत:चे वैयक्तिक स्वरूप कसे असू शकते, हे साधारण मनुष्याला जाणता येत नाही. भगवंत या भौतिक सृष्टीपासून भिन्न आहेत तरीही सर्व काही त्यांच्यावरच आश्रित आहे. याचेच वर्णन या ठिकाणी 'योगम् ऐश्वरम्' असे करण्यात आले आहे.

« Previous Next »