TEXT 42
doṣair etaiḥ kula-ghnānāṁ
varṇa-saṅkara-kārakaiḥ
utsādyante jāti-dharmāḥ
kula-dharmāś ca śāśvatāḥ
दोषै:- अशा दोषांमुळे; एतै:-या सर्व; कुल-ध्यानाम्- कुलघातकी किंवा कुटुंब नष्ट करणारे; वर्ण-सङ्कर-अवांछित संतती; कारकै:- जी मूळ किंवा कारणीभूत आहेत; उत्साद्यन्ते- उद्ध्वस्त होतात; जाति-धर्मा:- जातियोजना; सामुदायिक योजना; कुल-धर्मा:- कुलपरंपरा; च-सुद्धा; शाश्वत:- सनातन.
वंशपरंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दुष्ट कृत्यांमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंबकल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्त होतात.
तात्पर्य: सनातन धर्म किंवा वर्णाश्रमधर्म संस्थेने, मनुष्य अंतिम मोक्षाची प्राप्ती करण्यास समर्थ होऊ शकेल अशा पद्धतीने मानव -समाजातील चार विभागांना अनुसरुन सामुदायिक योजना तसेच कुटुंबकल्याणार्थ कार्याची योग्य रचना करून दिली आहे. म्हणून बेजबाबदार पुढर्यांनी सनातनधर्माच्या परंपरेचा भंग केल्यास समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे, श्रीविष्णूंची प्राप्ती हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे याचा लोकांना विसर पडतो. अशा पुढर्यांना अधं म्हटले जाते आणि जे लोक अशा नेत्यांचे अनुसरण करतात ते निश्चितपणे गोंधळून जातात.