No edit permissions for मराठी

TEXT 21

ādityānām ahaṁ viṣṇur
jyotiṣāṁ ravir aṁśumān
marīcir marutām asmi
nakṣatrāṇām ahaṁ śaśī

आदित्यनाम् -आदित्यांमध्ये; अहम्-मी; विष्णु:- विष्णू; ज्योतिषाम्‌-सर्व ज्योतींमध्ये; रवि:-सूर्य, अंशु-मान्-तेजस्वी किंवा देदीप्यमान; मरीचि:-मरीची; मरुताम्-मरुद्गणांमध्ये; अस्मि-मी आहे; नक्षत्राणाम्-नक्षत्रांमध्ये; अहम्-मी; शशी-चंद्र.

आदित्यांमध्ये विष्णू मी आहे, तेजस्व्यांमध्ये देदीप्यमान सूर्यमी आहे, मरुद्गणांमध्ये मरीची मी आहे आणि नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे.

तात्पर्य: बारा आदित्य आहेत व त्यामध्ये श्रीकृष्ण प्रमुख आहेत. आकाशात चमकणा-या तेजस्वी तान्यांमध्ये सूर्य प्रमुख आहे. ब्रह्मसंहितेत सूर्याचे वर्णन भगवंतांचा तेजस्वी नेत्र असे करण्यात आले आहे. आकाशात पत्रास विविध प्रकारचे वायू प्रवाहित होत असतात आणि त्यांची अधिष्ठात्री देवता मरीची, श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे.

          नक्षत्रांमध्ये रात्रीच्या वेळी चंद्र हा प्रमुख असतो आणि म्हणून चंद्र हा श्रीकृष्णांचे रूप आहे. या श्लोकावरून असे प्रतीत होते की, चंद्र हा अनेक नक्षत्रांपैकी एक आहे, म्हणून आकाशामध्ये लुकलुकणारी नक्षत्रेही सूर्यप्रकाशच परावर्तित करतात. ब्रह्मांडामध्ये अनेक सूर्य असल्याच्या सिद्धांताला वेद स्वीकार करीत नाहीत. सूर्य हा एकच आहे आणि ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे चंद्र प्रकाशमान होतो त्याचप्रमाणे सूर्यप्रकाशामुळेच नक्षत्रेही चमकतात. या ठिकाणी भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे चंद्र हा नक्षत्रांपैकी एक असल्यामुळे चमकणारे तारे हे सूर्य नसून चंद्राप्रमाणेच नक्षत्रे आहेत.

« Previous Next »