No edit permissions for मराठी

अध्याय दहावा

विभूतियोग

TEXT 1: श्रीभगवान म्हणाले, हे महाबाहो अर्जुना! पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुड़या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन, जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे.

TEXT 2: माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही तसेच महर्षीनाही कळत नाही, कारण सर्वप्रकारे देवतांचे आणि महर्षीचेही मूळ मीच आहे.

TEXT 3: सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा, अनादी, सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो.

TEXTS 4-5: बुद्धी, ज्ञान, संशय आणि मोह यातून मुक्तता, क्षमा, सत्यता, इंद्रियसंयमन, मनोनिग्रह, सुख आणि दुःख; जन्म, मृत्यू, भय, निर्भयता, अहिंसा, समता, संतुष्टी, तपस्या, दान, यश आणि अपयश इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झाले आहेत.

TEXT 6: सप्तर्षिगण आणि त्यांच्या पूर्वीचे चार महर्षी तसेच मनू (मानवजातीचे प्रजापती) माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात.

TEXT 7: ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योगशक्तीची वास्तविकपणे खात्री पटते, तो अनन्य भक्तियोगामध्ये तत्पर होतो, यात मुळीच संशय नाही.

TEXT 8: मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्तिकर्ता आहे. सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात.

TEXT 9: माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते, त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि

TEXT 10: जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो, ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील.

TEXT 11: त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी, ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने, अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो.

TEXTS 12-13: अर्जुन म्हणाला : तुम्हीच पुरुषोत्तम भगवान, परम धाम, परम पवित्र, परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत, दिव्य, आदिपुरुष, अजन्मा, विभू आहात. नारद, असित, देवल आणि व्यास यांसारख्या महर्षीनी तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वत: तुम्हीही मला तेच सांगत आहात.

TEXT 14: हे कृष्ण! तुम्ही जे सर्व मला सांगितले आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो. हे भगवन! देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाहीत.

TEXT 15: हे पुरुषोत्तम, हे भूतभावन, भुतेश, देवाधिदेव, हे जगत्पते! खरोखर, तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता.

TEXT 16: ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिला आहात, त्या अलौकिक ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा.

TEXT 17: हे योगेश्वर कृष्णा! मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे? हे भगवन्! कोणकोणत्या विविध रूपांत मी तुमचे स्मरण करावे?

TEXT 18: हे जनार्दन! कृपया आपल्या योगशक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसास्वादन करण्याची इच्छा होते.

TEXT 19: श्रीभगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तींबद्दल सांगेन; परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करीन, कारण हे अर्जुना! माझे ऐश्वर्य अनंत आहे.

TEXT 20: हे अर्जुना! सर्व जीवांच्या अंतर्यामी स्थित असणारा परमात्मा मी आहे. मीच सर्व जीवांचा आदि, मध्य आणि अंत आहे.

TEXT 21: आदित्यांमध्ये विष्णू मी आहे, तेजस्व्यांमध्ये देदीप्यमान सूर्यमी आहे, मरुद्गणांमध्ये मरीची मी आहे आणि नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे.

TEXT 22: वेदांमध्ये सामवेद मी आहे, देवतांमध्ये स्वर्गाचा राजा इंद्र मी आहे, इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि प्राणिमात्रांमधील चेतना मी आहे.

TEXT 23:  सर्व रुद्रांमध्ये शंकर मी आहे, यक्ष आणि राक्षसांमध्ये कुबेर मी आहे, वसूमध्ये अग्नी मी आहे, आणि सर्व पर्वतांमध्ये मेरू मी आहे.

TEXT 24: हे अर्जुना! पुरोहितांमधील प्रमुख पुरोहित, बृहस्पती मीच असल्याचे जाण. सेनापतींमध्ये कार्तिकेय मी आहे आणि जलाशयांमध्ये सागर मी आहे.

TEXT 25: महर्षीमध्ये भूगूमी आहे, ध्वनीमध्ये दिव्य कार मी आहे. यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे आणि अचल पदार्थामध्ये हिमालय पर्वत मी आहे.

TEXT 26: सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ वृक्ष मी आहे आणि सर्व देवर्षीमध्ये नारद मी आहे. गंधर्वांमध्ये चित्ररथ मी आहे आणि सर्व सिद्ध पुरुषांमध्ये कपिलमुनी मी आहे.

TEXT 27: अमृताप्राप्तीकरिता केलेल्या समुद्रमंथातून उत्पन्न झालेल्या अश्वांमधील अश्व, उच्चैश्रवा मीच आहे. गजेंद्रांमध्ये ऐरावत मी आहे आणि मनुष्यांमध्ये राजा मी आहे.

TEXT 28: सर्व आयुधांमध्ये वज्र मी आहे, गायींमध्ये सुरभी गाय मी आहे. प्रजोत्पादनास कारण असणारा कामदेव, मदन मी आहे आणि सर्पांमध्ये वासुकी मी आहे.

TEXT 29: नागांमध्ये अनंत मी आहे आणि जलचरांमध्ये मी वरुण आहे. पितरांमध्ये अर्यमा मी आहे आणि नियमन करणा-यांमध्ये मृत्यूचा नियंता यमदेव मी आहे.

TEXT 30: दैत्यांमध्ये भक्तराज प्रह्लाद मी आहे, दमन करणा-यांमध्ये काळ मी आहे, पशूमध्ये सिंह मी आहे आणि पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे.

TEXT 31: पवित्र करणा-यांमध्ये वायूमी आहे, शस्त्र धारण करणा-यांमध्ये राम मी आहे, मत्स्यांमध्ये मकरमासा मी आहे आणि प्रवाही नद्यांमध्ये गंगा नदी मी आहे.

TEXT 32: हे अर्जुना! सर्व सृजनांचा आदी, अंत आणि मध्यही मीच आहे. सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या मी आहे आणि तर्कशास्त्रींमध्ये निर्णायक सत्य मी आहे.

TEXT 33: अक्षरांमध्ये ''कार मी आहे आणि समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे. अविनाशी काळ मी आहे आणि सृष्टिकर्त्यांमध्ये ब्रह्मदेव मी आहे.

TEXT 34: सर्वहरण करणारा मृत्यूमी आहे आणि भविष्यामध्ये अस्तित्वात येणा-या प्रत्येक वस्तूचे कारणही मीच आहे. स्त्रियांमध्ये कीर्ती, ऐश्वर्य, मधुर वाणी, स्मृती, बुद्धी, दूढता आणि क्षमा मी आहे.

TEXT 35: सामवेदातील स्तोत्रांमध्ये बृहत्साम मी आहे आणि छंदांमध्ये गायत्री मी आहे, मासांमध्ये मार्गशीर्ष (नोव्हेंबर, डिसेंबर) मी आहे आणि ऋतूंमध्ये वसंत मी आहे.

TEXT 36: फसविणा-यांमध्येही द्युत मी आहे आणि तेजस्व्यांचे तेज मी आहे, विजय मी आहे, साहस आणि बलवानांचे बलही मीच आहे.

TEXT 37: वृष्णीवंशीयांमध्ये वासुदेव मी आहे आणि पांडवांमध्ये अर्जुन मी आहे. मुनींमध्ये व्यास मी आहे आणि महान विचारक कवींमध्ये उशना मी आहे.

TEXT 38: अराजकतेचे दमन करणा-या सर्व साधनांमध्ये दंड मी आहे आणि जे विजयेच्ळू आहेत त्यांची नीती मी आहे. रहस्यांमधील मौन मी आहे आणि ज्ञानीजनांमध्ये ज्ञान मी आहे.

TEXT 39: तसेच हे अर्जुना! संपूर्ण सृष्टीचे बीज मी आहे. कोणताही चराचर प्राणी माझ्याविना अस्तित्वात राहू शकत नाही.

TEXT 40: हे परंतप माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. मी तुला जे सांगितले आहे, ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे.

TEXT 41: सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुलिंगातून उत्पन्न झाल्या आहेत हे तूजाण.

TEXT 42: परंतु हे अर्जुन! या सा-या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे.

« Previous Next »