No edit permissions for मराठी

TEXT 22

vedānāṁ sāma-vedo ’smi
devānām asmi vāsavaḥ
indriyāṇāṁ manaś cāsmi
bhūtānām asmi cetanā

वेदानाम्-सर्व वेदांमध्ये; साम-वेदः-सामवेद; अस्मि-मी आहे; देवानाम्-सर्व देवतांमध्ये; अस्मि-मी आहे; वासव:-स्वर्गाचा राजा; इन्द्रियाणाम्-सर्व इंद्रियांमध्ये; मनः-मन; चसुद्धा; अस्मि-मी आहे; भूतानाम्-सर्व जीवांमध्ये; अस्मि-मी आहे; चेतना-चेतना.

वेदांमध्ये सामवेद मी आहे, देवतांमध्ये स्वर्गाचा राजा इंद्र मी आहे, इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि प्राणिमात्रांमधील चेतना मी आहे.

तात्पर्य: पदार्थ आणि चेतनतत्व यांतील भेद हाच आहे की, पदार्थाला जीवाप्रमाणे चेतना नसते. म्हणून ही चेतना श्रेष्ठ आणि शाश्वत आहे. जडतत्वांचे संयोगीकरण करून चेतना उत्पन्न करता येत नाही.

« Previous Next »