No edit permissions for मराठी

TEXT 3

yo mām ajam anādiṁ ca
vetti loka-maheśvaram
asammūḍhaḥ sa martyeṣu
sarva-pāpaiḥ pramucyate

यः-जो; माम्-मला; अजम्-अजन्मा; अनादिम्-अनादी, आरंभरहित; -सुद्धा; वेत्तिजाणतो; लोक-ग्रहलोकांचा; महा-ईश्वरम्-महेश्वर, स्वामी; असम्मूढ:-मोहरहित; सः-तो, मत्र्येषु-मत्र्य मनुष्यांमध्ये; सर्व-पापैः-सर्व पापांपासून; प्रमुच्यते-मुक्त होतो.

सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा, अनादी, सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो.

तात्पर्य: सातव्या अध्यायात (७.३) सांगितल्याप्रमाणे मनुष्याणां सहस्रेषु कश्र्चिद्यतति सिद्धये आध्यात्मिक साक्षात्काराप्रत उन्नती करण्याचा प्रयत्न करीत आहेत ते साधारण मनुष्य नव्हेत. आध्यात्मिक साक्षात्काराचे ज्ञान नसणा-या लक्षावधी साधारण मनुष्यांपेक्षा ते श्रेष्ठ आहेत, परंतु आपले आध्यात्मिक स्वरूप जाणण्याचा वास्तविकपणे प्रयत्न करणा-यांमध्ये जो श्रीकृष्णांना, पुरुषोत्तम भगवान, अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचा स्वामी, अजन्मा म्हणून जाणतो तो आध्यात्मिक साक्षात्कार झालेला अत्यंत यशस्वी मनुष्य होय. अशा अवस्थेत जेव्हा मनुष्याला श्रीकृष्णांच्या परमस्थितीचे ज्ञान होते तेव्हा तो सर्व पापांपासून पूर्णपणे मुक्त होतो.

          या श्लोकामध्ये, भगवंतांचे वर्णन आज अर्थात, अजन्मा या शब्दाने करण्यात आले आहे; परंतु दुस-या अध्यायात जीवांचे वर्णन केलेल्या अजया शब्दापासून हा शब्द भिन्न आहे. भौतिक आसक्तीमुळे वारंवार जन्म आणि मृत्यू होणा-या जीवांहून भगवंत भिन्न आहेत. बद्ध जीवात्मे देहांतर करीत असतात, परंतु भगवंतांचा देह कधीच बदलत नाही. जेव्हा ते या भौतिक जगतात अवतरित होतात, तेव्हा सुद्धा ते अजन्मा म्हणूनच येतात. म्हणून चौथ्या अध्यायात म्हटले आहे की, भगवंत आपल्या अंतरंगा शक्तीमुळे कधीही अपरा प्रकृतीच्या अधीन होत नाहीत, तर ते सदैव परा प्रकृतीतच असतात.

          या श्लोकामधील वेत्ति लोक महेश्वरम्- शब्द दर्शवितात की, भगवंत सर्व विश्वाचे, लोकांचे स्वामी आहेत हे मनुष्याने जाणले पाहिजे. भगवंत सृष्टीच्या पूर्वीही अस्तित्वात होते आणि ते आपल्या सृष्टीहून भिन्न आहेत. सर्व देवदेवतांची निर्मिती या भौतिक जगतातच झाली; परंतु भगवन श्रीकृष्ण अजन्मा आहेत म्हणून ब्रह्मदेव आणि शंकर इत्यादींसारख्या मोठमोठ्या देवतांहूनही ते भिन्न आहेत आणि ब्रह्मदेव, शिव आणि सर्व देवतांची त्यांनीच निर्मिती केल्यामुळे ते सर्व लोकांचे महेश्वर आहेत.

          श्रीकृष्ण हे सर्व निर्मित वस्तूंहून भिन्न आहेत आणि त्यांना या रूपामध्ये जो जाणतो तो तात्काळ सर्व पापांपासून मुक्त असणे अत्यावश्यक आहे. भगवद्‌गीतेत सांगितल्याप्रमाणे केवळ भक्तियोगानेच त्यांचे ज्ञान होतो. भगवद्ज्ञान प्राप्त करण्यासाठी मनुष्याने सर्व पापांतून मुक्त प्राप्त होऊ शकते, अन्य कोणत्याही साधनांनी नाही.

          श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजू नये. पूर्वी म्हटल्याप्रमाणे केवळ मूर्खच श्रीकृष्णांना साधारण मानव समजतो. हेच पुन्हा या श्लोकात निराळ्या पद्धतीने सांगण्यात आले आहे. जो मनुष्य मूर्ख नाही, जो भगवंतांचे स्वरूप जाणण्याइतपत बुद्धिमान आहे तो सदैव सर्व पापांतून मुक्तच असतो.

          जर श्रीकृष्ण देवकीपुत्र म्हणून जाणले जातात तर ते अजन्मा कसे होऊ शकतात? याचे विश्लेषणही श्रीमद्‌भगवतात करण्यात आले आहे. जेव्हा ते वसुदेव आणि देवकीसमोर प्रकट झाले तेव्हा एखाद्या सामान्य बालकाप्रमाणे ते जन्मलेले नव्हते. ते त्यांच्या मूळ रूपात प्रकट झाले आणि नंतर सामान्य बालकामध्ये त्यांनी स्वत:चे रूपांतर केले.

          श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली जे कर्म केले जाते ते सर्व दिव्यच असते. हे कर्म शुभ आणि अशुभ अशा भौतिक परिणामांनी दूषित होऊ शकत नाही. प्राकृत जगातील शुभाशुभत्वाची संकल्पना ही कमीअधिक प्रमाणात मन:कल्पित गोष्टच आहे, कारण या भौतिक जगतात कोणतीच गोष्ट शुभ नाही. सर्व काही अशुभच आहे, कारण मुळात भौतिक प्रकृतीच अशुभ आहे. आपण ही शुभ असल्याची केवळ कल्पना करतो. पूर्ण भक्तिभावाने आणि सेवाभावाने केलेल्या कृष्णभावनाभावित क्रियांवरच खरे मांगल्य अवलंबून असते. म्हणून जर आपल्याला आपली कमें शुभदायी करावयाची असतील तर आपण भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले पाहिजे. असे मार्गदर्शन श्रीमद्भागवत आणि भगवद्गीता यांसारख्या शास्त्रांमध्ये किंवा प्रामाणिक आध्यात्मिक गुरूद्वारे दिले जाते. आध्यात्मिक गुरू हे भगवंतांचे प्रतिनिधी असल्याकारणाने त्यांनी केलेले मार्गदर्शन म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांनी केलेले मार्गदर्शनच होय. आध्यात्मिक गुरू, साधू आणि शास्त्र एकाच प्रकारे मार्गदर्शन करतात. या तिघात कोणताच विरोधाभास नसतो. यांच्या आदेशानुसार केलेले सर्व कर्म या भौतिक जगताच्या पुण्य आणि पापकर्मापासून मुक्त असते. अशी कमें करताना भक्ताचा जो दिव्य भाव असतो तो वस्तुतः त्यागाचा भाव असतो आणि या भावालाच संन्यास असे म्हणतात. भगवद्गीतेतील सहाव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे जो भगवंतांच्या आदेशानुसार आपले कर्म, कर्तव्य म्हणून करतो आणि जो आपल्या कर्मफलांची अपेक्षा करीत नाही (अनाश्रित: कर्मफलमू) तोच वास्तविक संन्यासी आहे. भगवंतांच्या आदेशानुसार जो कोणी कर्म करतो तोच खरा संन्यासी आणि योगी होय. भोंदू योगी किंवा संन्याशांचा वेष परिधान करणारा मनुष्य ख-या अर्थाने संन्यासी किंवा योगी होऊ शकत नाही.

« Previous Next »