No edit permissions for मराठी

TEXTS 10-11

aneka-vaktra-nayanam
anekādbhuta-darśanam
aneka-divyābharaṇaṁ
divyānekodyatāyudham

divya-mālyāmbara-dharaṁ
divya-gandhānulepanam
sarvāścarya-mayaṁ devam
anantaṁ viśvato-mukham

अनेक—अनेक; वक्त्र—मुखे; नयनम्—नेत्र; अनेक—अनेक; अद्धत—अद्भुत, दर्शनम्— दृश्ये; अनेक-पुष्कळ; दिव्य-दिव्य; आभरणम्-अलंकार; दिव्य-दिव्य; अनेक-अनेक; उद्यत-सज्ज; आयुधम्-शस्त्रे; दिव्य-दिव्य; माल्य-माळा; अम्बर-वस्त्र; धरम्-धारण केलेली; दिव्य-दिव्य; गन्ध-सुगंधाने; अनुलेपनम्-माखलेली; सर्व-सर्व; आश्चर्य-मयम्- आश्चर्यमय; देवम्-प्रकाशमान; अनन्तम्-अनंत; विश्वतः-मुखम्--सर्वव्यापी.

अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्ये पाहिली. हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते. या विश्वरूपाने दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते.

तात्पर्य: या श्लोकांमध्ये वारंवार योजलेल्या अनेक या शब्दाद्वारे दर्शविण्यात आले आहे की, अर्जुन पाहात असलेल्या विश्वरूपाला संख्यातीत कर, चरण, मुखे आणि इतर रूपे होती. त्यांची ही रूपे सा-या विश्वभर पसरलेली होती; परंतु भगवंतांच्या कृपेमुळे बसल्याजागीच ती रूपे अर्जुनाने पाहिली. श्रीकृष्णांच्या अचिंत्य शक्तीचा हा प्रभाव आहे.

« Previous Next »