No edit permissions for मराठी

TEXT 12

divi sūrya-sahasrasya
bhaved yugapad utthitā
yadi bhāḥ sadṛśī sā syād
bhāsas tasya mahātmanaḥ

दिवि-आकाशामध्ये; सूर्य-सूर्यांचे; सहस्रस्य-हजारो; भवेत्-जर होईल; युगपत्-एकाच वेळी; उत्थिता-प्रकट;यदि-जर; भाः-प्रकाश; सदृशी-सारखे; सा-ते; स्यात्-कदाचित; भासः -तेजः; तस्य-त्याचे; महा-त्मनः-भगवान.

आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचितच त्यांचे  तेज भगवंतांच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल.

तात्पर्य: अर्जुनाने जे पाहिले ते अवर्णनीय होते तरीपण संजय त्या विश्वरूपाची कल्पना धृतराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करीत आहे. संजय किंवा धृतराष्ट्र दोघेही युद्धभूमीवर उपस्थित नव्हते; परंतु व्यासकृपेमुळे युद्धभूमीवर जे काही घडत होते ते सर्व काही संजय पाहू शकत होता. म्हणून तो ज्याप्रमाणे समजू शकला त्याप्रमाणे त्याने विश्वरूपाची तुलना काल्पनिक परिस्थितीशी (हजारो सूर्यांशी) केली.

« Previous Next »