TEXT 39
vāyur yamo ’gnir varuṇaḥ śaśāṅkaḥ
prajāpatis tvaṁ prapitāmahaś ca
namo namas te ’stu sahasra-kṛtvaḥ
punaś ca bhūyo ’pi namo namas te
वायुः-वायू: यमः-नियंता; अग्निः-अग्नी; वरुणः-जल; शश-अङ्कः-चंद्र; प्रजापतिः ब्रह्मदेव; त्वम्-तुम्ही; प्रपितामहः-प्रपितामह; च-सुद्धा; नमः-माझा नमस्कार; नमः-पुनः पुन्हा नमस्कार; ते-तुम्हाला; अस्तु-असोत; सहस्र-कृत्वः-सहस्र वेळा; पुनः च-पुन्हा; भूयः-पुन्हा; अपि-सुद्धा; नमः-नमस्कार; नमः ते-माझा तुम्हाला नमस्कार,
तुम्ही वायू आहात, परमनियंता, अग्नी, जल आणि चंद्रदेखील तुम्हीच आहात; तुम्ही आदिजीव ब्रह्मदेव तसेच प्रपितामहही तुम्हीच आहात. म्हणून माझा तुम्हाला सहस्रशः नमस्कार असो आणि पुनः पुन्हा मी तुम्हाला नमस्कार करतो.
तात्पर्य: या श्लोकामध्ये भगवंतांना वायू म्हणून संबोधण्यात आले आहे, कारण वायू हा सर्वव्यापी असल्यामुळे सर्व देवतांमध्ये प्रमुख आहे. तसेच अर्जुन, श्रीकृष्णांना प्रपितामह असे संबोधतो, कारण श्रीकृष्ण हे सृष्टीमध्ये प्रथम जन्मलेल्या ब्रह्मदेवाचेही पिता आहेत.