No edit permissions for मराठी

TEXT 49

mā te vyathā mā ca vimūḍha-bhāvo
dṛṣṭvā rūpaṁ ghoram īdṛṅ mamedam
vyapeta-bhīḥ prīta-manāḥ punas tvaṁ
tad eva me rūpam idaṁ prapaśya

मा-होऊ देऊ नकोस; ते-तुला; व्यथा-व्यथा; मा-होऊ देऊ नकोस; -सुद्धा; विमूढभाव:-भ्रांती; दृष्ट्रा-पाहून; रूपम्-रूप; घोरम्—घोर किंवा भयंकर; ईष्टक्—जसे आहे तसे; मम-माझे; इदम्—हे; व्यपेत-भीः-सर्व भयांपासून मुक्तता; प्रीत-मनाः—प्रसन्नचित्त हो; पुनः— पुन्हा; त्वम्-तू; तत्-ते; एव-याप्रमाणे; मे-माझे; रूपम्-रूप; इदम्-हे; प्रपश्य-पाहा.

माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहेस, आता हे रूप मी समाप्त करतो. हे मद्भक्ता! सर्व क्लेशांतून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांतचित्ताने पाहू शकतोस.

तात्पर्य: भगवद्गीतेच्या प्रारंभी पूजनीय पितामह भीष्म आणि गुरू द्रोणाचार्यांचा कसा वध करावा याची अर्जुनाला चिंता होती; परंतु श्रीकृष्णांनी सांगितले आहे की, त्याने आपल्या पितामहांचा वध करण्यात भयभीत होण्याची जरुरी नाही. कुरुसभेत धृतराष्ट्रपुत्रांनी जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य दोघेही मुकाट्याने बसले होते. म्हणून स्वकर्तव्याच्या बाबतीत असा निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांना मारणे उचितच आहे. त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना पूर्वीच मारण्यात आले आहे हे दाखविण्याकरिताच श्रीकृष्णांनी अर्जुनासमोर आपले विश्वरूप प्रकट केले. हे दृश्य अर्जुनाला दाखविण्याचे कारण म्हणजे, भक्त हे सदैव शांतचित्त असतात आणि अशी भयंकर कृत्ये ते करू शकत नाहीत. विश्वरूपाच्या प्रकटीकरणाचे प्रयोजन स्पष्ट करण्यात आले होते, आता अर्जुनाला चतुर्भुज रूप पाहावयाची इच्छा होती आणि श्रीकृष्णांनी चतुर्भुज रूप प्रकट केले. भक्ताला विश्वरूपामध्ये फारशी रुची नसते, कारण विश्वरूपाशी प्रेमाचे आदानप्रदान होऊ शकत नाही. भक्ताला एकतर आपला भक्तिभाव आदरपूर्वक भगवंतांना अर्पण करावयाची इच्छा असते किंवा श्रीकृष्णांचे द्विभुज रूप पाहण्याची इच्छा असते, जेणेकरून तो भगवंतांशी प्रेमभक्तीचे आदानप्रदान करू शकेल.

« Previous Next »