No edit permissions for मराठी

TEXT 15

yasmān nodvijate loko
lokān nodvijate ca yaḥ
harṣāmarṣa-bhayodvegair
mukto yaḥ sa ca me priyaḥ

यस्मात्-ज्याच्यामुळे; -कधीही नाही; उद्विजते-उद्विग्न होतात; लोकः-लोक; लोकात-लोकांपासून; -कधीही नाही; उद्विजते-उद्विग्न होतो; -सुद्धा; यः-जो कोणी; हर्ष-हर्षापासून; अमर्ष-दुःख; भय-भय; उद्रेगै:-आणि चिंता; मुक्तः-मुक्त; यः-जो; सः-तो; -सुद्धा; मे-मला; प्रियः-प्रिय.

ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो तो मला अत्यंत प्रिय आहे.

तात्पर्य: या श्लोकात भक्ताच्या आणखी काही गुणांचे वर्णन करण्यात आले आहे. अशा भक्ताद्वारे कोणालाही कष्ट, चिंता, भय किंवा असंतोष होत नाही. भक्त सर्वांप्रति दयाळू असल्यामुळे दुस-यांना त्रास होईल असे काहीही तो करीत नाही. त्याचबरोबर इतरांनी जरी भक्ताला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी तो उद्विग्न होत नाही. भगवंतांच्या कृपेने, तो साधनेमुळे इतका प्रगत झालेला असतो की, तो कोणत्याही बाह्य उपद्रवांनी क्षुब्ध होत नाही. वास्तविकपणे भक्त सदैव कृष्णभावनाभावित असल्यामुळे आणि भक्तीमध्ये संलग्न असल्यामुळे अशा भौतिक परिस्थितीमुळे तो विचलित होत नाही. सामान्यत: याविषयी मनुष्याला जेव्हा आपल्या शरीरासाठी किंवा इंद्रियतृप्तीसाठी काही आढळते तेव्हा तो अतिशय आनंदी होतो; परंतु आपल्याकडे नसणारी इंद्रियतृप्तीची साधने इतरांकडे पाहिल्यावर तो दुःखी होतो आणि इतरांचा द्वेष करू लागतो. जेव्हा त्याला आपल्या शत्रूकडून प्रतिकाराची अपेक्षा असते तेव्हा तो भयभीत झालेला असतो आणि जेव्हा तो यशस्वीपणे काही करू शकत नाही तेव्हा तो खिन्न होतो. जो भक्त सदैव अशा विकारांच्या पलीकडे गेलेला असतो तो श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असतो.

« Previous Next »