No edit permissions for मराठी

TEXT 25

dhyānenātmani paśyanti
kecid ātmānam ātmanā
anye sāṅkhyena yogena
karma-yogena cāpare

ध्यानेन-ध्यानाद्वारे; आत्मनि-आपल्या ठायी; पश्यन्ति-पाहतो; केचित्-काहीजण; आत्मानम्-परमात्मा;आत्मना-मनाने; अन्ये-अन्य; साङ्ख्येन-सांख्य किंवा तात्विक चर्चेद्वारे; योगेन-योगमार्गाने; कर्म-योगेन-निष्काम कर्माद्वारे; च-सुद्धा; अपरे-इतर.

काहीजण परमात्म्याची अनुभूती आपल्या अंतरात ध्यानाद्वारे, इतर काहीजण ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे आणि अन्य काहीजण निष्काम कर्माद्वारे करतात.

तात्पर्य: भगवंत अर्जुनाला सांगतात की, मनुष्याच्या आत्मसाक्षात्काराच्या शोधाबद्दल सांगावयाचे तर बद्ध जीवांचे दोन प्रकारे वर्गीकरण करता येते. जे नास्तिक, अद्वैतवादी आणि संशयखोर आहेत त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचे आकलनही होऊ शकत नाही. परंतु इतर काहीजण आहेत तत्वज्ञानी आणि निष्काम कर्मयोगी असे म्हटले जाते. जे सदैव अद्वैतवादाचा पुरस्कार करतात त्यांना सुद्धा नास्तिक आणि अज्ञेयवादी वर्गातच गणले जाते. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर केवळ भगवद्भक्तच आध्यात्मिक ज्ञानामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेले असतात, कारण ते जाणतात की, या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आध्यात्मिक जगत आणि पुरुषोत्तम भगवान आहेत. भगवंत हे परमात्मारूपामध्ये विस्तार करून जीवांसहित सर्व गोष्टी व्यापतात. अर्थात, असे काहीजण आहेत जे ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे परम सत्य जाणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांची गणना श्रद्धावानांमध्ये केली जाऊ शकते. सांख्य तत्वज्ञानी या भौतिक जगताचे चोवीस तत्त्वांमध्ये पृथक्करण करतात आणि ते जीवाला पंचविसावे तत्व मानतात. स्वरूपतः जीवात्मा हा भौतिक तत्वांच्या पलीकडे आहे हे जेव्हा ते जाणू शकतात तेव्हा जीवात्म्याच्याही पलीकडे भगवंत आहेत हे जाणू शकतात. भगवंत हे सव्विसावे तत्व आहे. याप्रमाणे ते सुद्धा क्रमश: कृष्णभावनामय भक्तीच्या स्तराप्रत येतात. जे निष्काम भावाने कर्म करतात ते सुद्धा आपल्या उद्दिष्टांमध्ये परिपूर्ण असतात. त्यांनाही कृष्णभावनामय भक्तीच्या स्तराची प्राप्ती करण्याकरिता संधी उपलब्ध करून दिली जाते. या ठिकाणी म्हटले आहे की, ज्यांची चेतना शुद्ध झालेली आहे आणि जे ध्यानाद्वारे परमात्म्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांना जेव्हा स्वत:च्या अंतर्यामी परमात्म्याची प्राप्ती होते तेव्हा ते दिव्य स्तरावर स्थित होतात. त्याचप्रमाणे इतर काहीजण आहेत जे ज्ञानाच्या अनुशीलनाने परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करीत असतात आणि अन्य काही हठयोगाचा अभ्यास करतात आणि भगवंतांना आपल्या पोरखेळांनी संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात.

« Previous Next »