No edit permissions for मराठी

TEXT 34

yathā prakāśayaty ekaḥ
kṛtsnaṁ lokam imaṁ raviḥ
kṣetraṁ kṣetrī tathā kṛtsnaṁ
prakāśayati bhārata

यथा-ज्याप्रमाणे; प्रकाशयति-प्रकाशित करतो; एकः-एक; कृत्स्नम्-संपूर्ण; लोकम्विश्व; इमम्—या; रविः-सूर्य; क्षेत्रम्-हे शरीर किंवा क्षेत्र; क्षेत्री-आत्मा; तथा-त्याप्रमाणे; कृत्स्नम्-सर्व, प्रकाशयति-प्रकाशित करती, भारत-हे भारता.

हे भारता! ज्याप्रमाणे एकमेव सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे शरीरात असणारा एकमेव जीव, चेतनेद्वारे संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो.

तात्पर्य: चेतनेसंबंधी विविध मते आहेत. भगवद्गीतेत या श्लोकामध्ये सूर्य आणि सूर्यप्रकाशाचे उदाहरण देण्यात आले आहे. ज्याप्रमाणे सूर्य हा एकाच ठिकाणी स्थित असतो तरी तो संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो त्याप्रमाणे अणुरूप सूक्ष्म जीव जरी या शरीराच्या हृदयामध्ये स्थित असला तरी चेतनेद्वारे तो संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो. म्हणून ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश हा सूर्याच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे, त्याप्रमाणे चेतना ही आत्म्याच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे. जेव्हा आत्मा शरीरामध्ये उपस्थित असतो तेव्हा संपूर्ण शरीरभर चेतना पसरलेली असते आणि ज्याक्षणी आत्मा शरीराचा त्याग करतो तत्क्षणी चेतनाही नाहीशी होते. हे कोणताही बुद्धिमान मनुष्य जाणू शकतो. म्हणून चेतना ही पदार्थाच्या संयोगीकरणामुळे निर्माण होत नाही. चेतना ही जीवात्म्याचे लक्षण आहे. जीवाची चेतना ही जरी गुणात्मकदृष्ट्या परमचेतनेशी एकरूपच असली तरी ती श्रेष्ठ नाही. कारण एका विशिष्ट शरीरातील चेतना ही दुसरे शरीर व्याप्त करू शकत नाही. परंतु जीवाचा मित्र असणारा परमात्मा सर्व शरीरांमध्ये उपस्थित असतो आणि त्याला सर्व शरीरांची जाणीव असते. हाच परमचेतना आणि जीवचेतना यातील भेद होय.

« Previous Next »