No edit permissions for मराठी

TEXT 20

guṇān etān atītya trīn
dehī deha-samudbhavān
janma-mṛtyu-jarā-duḥkhair
vimukto ’mṛtam aśnute

गुणान्-गुण; एतान्-हे सर्व, अतीत्य-अतीत जाऊन; त्रीन्-तीन; देही-देहधारी; देह-देह, शरीर; समुद्भवान्-उत्पन्न; जन्म-जन्म; मृत्यु-मृत्यूः जरा-वार्धक्य; दुःखैः-दुःखांपासून; विमुक्त:-मुक्त होऊन; अमृतम्-अमृत; अश्नुते-भोगतो.

जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो तेव्हा तो जन्म, मृत्यू, जरा आणि त्यापासून होणा-या दु:खांतून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो.

तात्पर्य: मनुष्य या शरीरात असूनही, कृष्णभावनाभावित होऊन दिव्य स्वरूपामध्ये कसा स्थित होऊ शकतो याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. देही या संस्कृत शब्दाचा 'देहधारी' असा अर्थ होतो. मनुष्य जरी या भौतिक देहामध्ये बद्ध असला तरी, आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करून तो प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून मुक्त होऊ शकतो. या देहात असूनही तो आध्यात्मिक जीवनाच्या सुखाचा अनुभव घेऊ शकतो, कारण या देहाचा त्याग केल्यानंतर निश्चितच तो आध्यात्मिक जगताला प्राप्त होतो. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, कृष्णभावनामय भक्ती ही भौतिक बंधनातून मुक्त होण्याचे लक्षण आहे आणि याचे स्पष्टीकरण अठराव्या अध्यायात करण्यात येईल. जेव्हा मनुष्य प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून मुक्त होतो तेव्हा तो भक्तीमध्ये प्रवेश करतो.

« Previous Next »