No edit permissions for मराठी

TEXT 21

arjuna uvāca
kair liṅgais trīn guṇān etān
atīto bhavati prabho
kim-ācāraḥ kathaṁ caitāṁs
trīn guṇān ativartate

अर्जुनः उवाच-अर्जुन म्हणाला; कैः-कोणत्या; लिङ्गैः-लक्षणांनी; त्रीन्-तीन; गुणान्-गुण; एतान्-या सर्व; अतीतः-अतीत होऊन; भवति-आहे; प्रभो-हे प्रभो; किम्-काय; आचारः-आचरण; कथम्-कसे; -सुद्धा; एतान्-या; त्रीन्-तीन; गुणान्-गुण; अतिवर्तते-पलीकडे जातो.

अर्जुनाने विचारले, हे प्रभो ! त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो?

तात्पर्य: या श्लोकामध्ये अर्जुनाने विचारलेले प्रश्न योग्यच आहेत. त्रिगुणांना पूर्वीच पार केले आहे त्या मनुष्याची लक्षणे अर्जुन जाणू इच्छितो. प्रथम तो अशा दिव्य पुरुषाची लक्षणे विचारीत आहे. असा मनुष्य त्रिगुणांच्या प्रभावाच्याही पलीकडे गेला आहे हे कोणालाही कसे समजू शकेल? अर्जुनाचा दुसरा प्रश्न आहे की, तो मनुष्य कसा राहतो आणि त्याचे कर्म कोणते असते? तो स्वेच्छाचारी असतो की नियमाचारी असतो? त्यानंतर दिव्य स्वभावाची तो ज्या माध्यमाने प्राप्ती करतो त्या माध्यमांबद्दल अर्जुन विचारतो. हे फार महत्वपूर्ण आहे. मनुष्य ज्या प्रत्यक्ष साधनांद्वारे सदैव दिव्यत्वामध्ये स्थित राहू शकतो त्या साधनांविषयी तो जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत ती लक्षणे अभिव्यक्त होण्याची शक्यताच नाही. म्हणून अर्जुनाने विचारलेले हे सारे प्रश्न अत्यंत महत्वपूर्ण आहेत आणि भगवंत त्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत.

« Previous Next »