TEXT 5
sattvaṁ rajas tama iti
guṇāḥ prakṛti-sambhavāḥ
nibadhnanti mahā-bāho
dehe dehinam avyayam
सत्त्वम्-सत्त्वगुण; रजः-रजोगुणः; तमः—तमोगुण; इति—याप्रमाणे; गुणाः-गुण; प्रकृति— भौतिक प्रकृती ; सम्भवाः-उत्पन्न झालेले; निबध्नन्ति-बद्ध होतात, महा–बाहो-हे महाबाहो; देहे—या देहामध्ये; देहिनम्—जीवः अव्ययम्—शाश्वत, अव्यय.
भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या तीन गुणांनी बनलेली आहे. हे महाबाहू अर्जुन! जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणांमुळे तो बद्ध होतो.
तात्पर्य: जीव हा दिव्य असल्यामुळे त्याला या भौतिक प्रकृतीशी मुळीच कर्तव्य नसते. तरीही भौतिक जगताद्वारे बद्ध झाल्यामुळे तो त्रिगुणांच्या वर्चस्वाखाली कार्य करीत असतो. प्रकृतीच्या विविध रूपांनुसार जीवांना निरनिराळ्या प्रकारची शरीरे प्राप्त झाल्यामुळे त्यांना त्या प्रकृतीला अनुसरून कार्य करावे लागते. हेच विविध प्रकारच्या सुखदुःखांचे कारण आहे.