No edit permissions for मराठी

TEXT 18

yasmāt kṣaram atīto ’ham
akṣarād api cottamaḥ
ato ’smi loke vede ca
prathitaḥ puruṣottamaḥ

यस्मात्-कारण; क्षरम्-च्युत किंवा क्षराच्या; अतीतः-दिव्य किंवा अतीत; अहम्-मी आहे; अक्षरात्-अच्युत अथवा अक्षराच्याही अतीत; अपि-सुद्धाः -आणि; उत्तमः-उत्तम; अतः-म्हणून; अस्मि-मी आहे; लोके-जगतामध्ये; वेदे-वेदांमध्ये; च-आणि; प्रथितः-प्रसिद्ध; पुरुष-उत्तमः-पुरुषोत्तम म्हणून.

मी च्युत आणि अच्युत यांच्याही अतीत, दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे, जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे.

तात्पर्य: भगवान श्रीकृष्णांहून बद्ध जीव किंवा मुक्त जीवही श्रेष्ठ नाहीत. म्हणूनच ते पुरुषोत्तम आहेत. आता या श्लोकावरून स्पष्टच आहे की, जीव आणि भगवंत यांना आपापले वैयक्तिक स्वरूप आहे. या दोहोंमधील फरक हा आहे की, बद्धावस्थेतील असोत अथवा मुक्तावस्थेतील असोत परिमाणात्मकदृष्ट्या जीव भगवंतांच्या शक्तीपेक्षा वरचढ होऊ शकत नाहीत. भगवंत आणि जीव हे सर्व बाबतीत समस्तर किंवा समरूपच आहेत असा विचार करणे चुकीचे आहे. भगवंत आणि जीव यांच्यामध्ये सदैव श्रेष्ठता आणि कनिष्ठता असतेच. या संदर्भात उत्तम शब्द महत्वपूर्ण आहे. कोणीही भगवंतांपेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही.

          लोके शब्द पौरुष आगम (स्मृतिशास्त्र) असे दर्शवितो. निरुक्ती शब्दकोषामध्ये सांगितल्याप्रमाणे लोक्यते वेदार्थोऽनेन-'वेदांचे प्रयोजन स्मृतिशास्त्रामध्ये सांगण्यात आले

भगवंतांचे, त्यांच्या अंतर्यामी परमात्मा रूपाचेही वेदांमध्ये वर्णन करण्यात आली आहे. वेदांमध्ये (छान्दोग्य उपनिषद् ८.१२.३) पुढील श्लोक आढळतो. तावदेषसम्प्रसादोऽस्माच्छरीरात्समुत्थाय परं ज्योतिरुंप सम्पद्य स्वेन रूपेणाभिनिष्पद्यते स उत्तम: पुरुष:- ‘देहातून बाहेर येणारा परमात्मा निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करतो आणि नंतर आपल्या आध्यात्मिक स्वरूपामध्येच स्थित राहतो.' त्या परमात्म्यालाच पुरुषोत्तम म्हटले जाते. याचा अर्थ आहे की, परमपुरुष आपले आध्यात्मिक तेज प्रदर्शित आणि प्रसारित करीत आहेत आणि हे तेज म्हणजेच सर्वश्रेष्ठ प्रकाश आहे. त्या परमपुरुषाचे अंतर्यामी परमात्मा हेही एक रूप आहे. सत्यवती आणि पराशर मुनींचे पुत्र म्हणून प्रकट होऊन ते स्वतः व्यासदेवांच्या रूपात वैदिक ज्ञानाचे विश्लेषण करतात.

« Previous Next »