No edit permissions for मराठी

TEXT 18

ahaṅkāraṁ balaṁ darpaṁ
kāmaṁ krodhaṁ ca saṁśritāḥ
mām ātma-para-deheṣu
pradviṣanto ’bhyasūyakāḥ

अहङ्कारम्—मिथ्या अहंकार, बलम्—बल; दर्पम्—गर्व, कामम्—काम, विषयभोग; क्रोधम्‌-क्रोध;-सुद्धा;संश्रिता:-आश्रय घेऊन; माम्-मला;आत्म-त्यांच्या स्वत:च्या; पर-आणि इतरांच्या; देहेषु-देहामध्ये; प्रद्विषन्तः-निंदा करीत; अभ्यसूयका:-द्देष करणारे.

मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यामुळे मोहित झालेले आसुरी लोक, आपल्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असणा-या भगवंतांचा द्वेष करतात आणि ख-या धर्माची निंदा करतात.

तात्पर्य: आसुरी मनुष्य भगवंतांच्या श्रेष्ठतेला विरोध करतो व त्याचा शास्त्रावर विश्वास नसतो. आसुरी मनुष्य, भगवंत आणि शास्त्रांचा सदैव द्वेष करतो. त्याला प्राप्त झालेल्या तथाकथित प्रतिष्ठेमुळे, त्याच्याकडे असणा-या धनसंचयामुळे आणि बळामुळे तो असे करण्यास प्रवृत्त होतो. त्याला माहीत नसते की, वर्तमान जीवन म्हणजे पुढील जन्माची तयारी आहे. त्याला हे माहीत नसल्याने वस्तुतः तो स्वतःचाच आणि त्याचबरोबर इतरांचाही द्वेष करीत असतो. यामुळे तो स्वतःच्या आणि इतरांच्याही शरीराची हिंसाच करीत असतो. तो अज्ञानी असल्यामुळे भगवंतांच्या नियंत्रणाची पर्वा करीत नाही. भगवंतांचा आणि शास्त्रांचा द्वेषी असल्यामुळे तो परमेश्वराच्या अस्तित्वाबाबत वादविवाद करतो आणि शास्त्रप्रमाणांची अधिकृतता नाकारतो. आपले प्रत्येक कर्म करताना तो स्वत:ला स्वतंत्र आणि सामथ्र्यशाली समजतो. आपल्याइतके बल, सामर्थ्य  किंवा धन इतर कोणाकडेच नाही असे वाटत असल्यामुळे तो वाटेल तसे वागतो आणि त्याला वाटते की, आपल्याला कोणीही राखू शकणार नाही. त्याच्या इंद्रियतृप्तीच्या आड येणारा कोणी शत्रू असेल तर त्या शत्रूला स्वबळावर नष्ट करावयाच्या योजना तो आखतो.

« Previous Next »