No edit permissions for मराठी

TEXT 19

tān ahaṁ dviṣataḥ krūrān
saṁsāreṣu narādhamān
kṣipāmy ajasram aśubhān
āsurīṣv eva yoniṣu

तान्—त्या; अहम्—मी; द्विषतः—द्वेषी; क्रूरान्—कूर; संसारेषु-संसारामध्ये; नर-अधमान्‌-नराधम; क्षिपामि-मी घालतो; अजस्त्रम्-निरंतरः अशुभान्-अशुभ; आसुरीषु-आसुरी; एव-- निश्चितपणे, योनिषु—योनीमध्ये.

जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनींत टाकीत असतो.

तात्पर्य: या श्लोकामध्ये स्पष्टपणे दर्शविण्यात आले आहे की, विशिष्ट जीवाला विशिष्ट देह प्रदान करणे हे परमेश्वराच्या अखत्यारीनुसार घडते. भगवंतांच्या श्रेष्ठतेचा स्वीकार करण्यास आसुरी मनुष्य राजी नसेल आणि ही वस्तुस्थिती आहे की तो आपल्या लहरीप्रमाणे कर्म करू शकतो; परंतु त्याचा पुनर्जन्म त्याच्या स्वत:च्या निर्णयावर अवलंबून नसून भगवंतांच्या इच्छेवर अवलंबून असतो. श्रीमद्भागवतातील तिस-या स्कंधामध्ये म्हटले आहे की, जीवाला मृत्यूनंतर मातेच्या उदरामध्ये गर्भस्थ केले जाते. तेथे त्याला दैवी शक्तीच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट प्रकारचे शरीर प्राप्त होते. म्हणून भौतिक प्रकृतीमध्ये आपल्याला पशू, कृमी, मनुष्य इत्यादी अनेक प्रकारच्या योनी आढळतात. या सर्व योनींची निर्मिती आकस्मिकपणे होत नसून दैवी शक्तीच्या योजनेनुसार होते. परंतु असुरांच्या बाबतीत तर त्यांना चिरकाळासाठी असुरांच्या योनीमध्ये ठेवले जाते आणि अशा प्रकारे ते द्वेषी आणि नराधमच राहतात. अशा आसुरी योनीतील लोक हे सदैव कामुक, सदैव हिंसक, द्वेषी आणि अपवित्रच असतात. अरण्यातील अनेक प्रकारच्या शिका-यांना आसुरी योनीतील मानण्यात येते.

« Previous Next »