No edit permissions for मराठी

TEXT 22

etair vimuktaḥ kaunteya
tamo-dvārais tribhir naraḥ
ācaraty ātmanaḥ śreyas
tato yāti parāṁ gatim

एतैः-या; विमुक्तः-मुक्त होऊन; कौन्तेय-हे काँतेय; तमः-द्वारैः-अज्ञानाच्या द्वारांपासून; त्रिभिः—तीन प्रकारच्या; नरः-मनुष्यः आचरति-करतो; आत्मनः-आत्म्यासाठी; श्रेयः श्रेयस्कर, ततः—त्यानंतर; याति—तो जातो; पराम्—परम; गतिम्—गती.

हे कौंतेया! जो मनुष्य नरकाच्या या तीन द्वारांतून सुटला आहे तो आत्म साक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परम गतीला प्राप्त होतो.

तात्पर्य: काम, क्रोध, लोभ हे मनुष्यजीवनाचे शत्रू आहेत आणि मनुष्याने यांच्यापासून फार सावध राहिले पाहिजे. जितक्या प्रमाणात मनुष्य काम, क्रोध आणि लोभ यापासून मुक्त होतो तितक्या प्रमाणात त्याचे जीवन शुद्ध होते. नंतर तो वेदोक्त विधिविधानांचे पालन करू शकतो. मनुष्यजीवनाच्या नियामक तत्वांचे पालन करून हळूहळू आध्यात्मिक साक्षात्काराच्या स्तरापर्यंत उन्नत होऊ शकते. अशा आचरणाद्वारे मनुष्य कृष्णभावनेच्या स्तरापर्यंत उन्नत होण्याइतका भाग्यवान असेल तर त्याची यशप्राप्ती सुनिश्चित असते. वैदिक शास्त्रांमध्ये मनुष्याच्या शुद्धीकरणाकरिता कर्म आणि कर्मफले यांच्या विधींचा निर्देश केलेला आहे. ही संपूर्ण पद्धती काम, क्रोध व लोभ यांच्या त्यागावर आधारलेली आहे. या पद्धतीच्या ज्ञानाचे अनुशीलन केल्याने मनुष्य, आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेपर्यंत उन्नत होऊ शकतो आणि अशा आत्मसाक्षात्काराची पूर्णता भक्तियोगामध्ये होते. या भक्तिपूर्ण सेवेमुळे बद्ध जीवाची मुक्ती सुनिश्चित असते. म्हणून वेदामध्ये वर्णाश्रम धर्म सांगण्यात आला आहे. निरनिराळ्या वर्णासाठी निरनिराळी विधिविधाने निर्देशित करण्यात आली आहेत आणि जर मनुष्य त्यांचे पालन करू शकला तर आपोआपच त्याची आध्यात्मिक साक्षात्काराच्या सर्वोच्च स्तरापर्यंत प्रगती होते. त्यानंतर त्याला मोक्षप्राप्ती होते यात मुळीच संदेह नाही.

« Previous Next »