No edit permissions for मराठी

TEXT 4

dambho darpo ’bhimānaś ca
krodhaḥ pāruṣyam eva ca
ajñānaṁ cābhijātasya
pārtha sampadam āsurīm

दम्भः-दंभ, अहंकार; दर्प:-उर्मटपणा; अभिमानः-अभिमान गर्वं; -सुद्धा; क्रोध: -क्रोध; पारुष्यम्‌-कठोरपणा किंवा उग्रपणाः एव-निश्चितपणे; -आाणिः; अज्ञानम्-अज्ञान; -आणि; अभिजातस्य-जन्मलेल्या; पार्थ-हे पार्थ; सम्पदम्-गुण; आसुरीम्-आसुरी प्रकृतीचे.

हे पार्था! दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत.

तात्पर्य: या श्लोकात नरकामध्ये जाण्याच्या राजमार्गाचे वर्णन करण्यात आले आहे. आसुरी लोक जरी नियमांचे पालन करीत नसले तरी त्यांना धार्मिकतेचा व आध्यात्मिक विज्ञान विकासाचा देखावा करावयाची इच्छा असते. त्यांना आपल्याकडील शैक्षणिक पात्रतेचा किंवा संपत्तीचा सदैव अभिमान असतो. इतरांनी आपली पूजा करावी आणि आपल्याला मानसन्मान द्यावा अशी त्यांची अपेक्षा असते. वस्तुतः ते मान देण्यायोग्य नसतातच. क्षुलक गोष्टीवरून ते क्रोधित होतात आणि अत्यंत कठोरपणे बोलतात. काय करावे आणि काय करू नये हे त्यांना कळत नाही. ते आपल्या इच्छेनुसार व लहरीखातर काहीही करतात आणि कोणतेही प्रमाण मानीत नाहीत. मातेच्या उदरात त्यांची शरीरे असल्यापासूनच त्यांनी हे आसुरी गुण धारण केलेले असतात आणि जसे जसे ते वाढत जातात तसतसे हे सारे अशुभ गुण ते प्रकट करतात.

« Previous Next »