No edit permissions for मराठी

TEXT 5

daivī sampad vimokṣāya
nibandhāyāsurī matā
mā śucaḥ sampadaṁ daivīm
abhijāto ’si pāṇḍava

दैवी-दैवी, सम्पत्-उपयुक्तता किंवा लाभ, विमोक्षाय-मोक्षदायक, निबन्धाय-बंधनकारक; आसुरी-आसुरी गुण; मता-मानले जातात; मा-करू नको; शुचः-चिंता; सम्पदम्-लाभ; दैवीम्-दैवी; अभिजात:-उत्पन्न; असि-तू आहेस; पाण्डव-हे पांडव.

दैवी गुण मोक्षदायक असतात तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा! तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस.

तात्पर्य: भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला तू आसुरी गुणांसह जन्मलेला नाहीस, असे सांगून प्रोत्साहन दिले. त्याने युद्धात भाग घेणे हे आसुरी वृत्तीचे लक्षण नव्हते, कारण तो युद्धासंबंधी साधकबाधक विचार करीत होता. भीष्म, द्रोण इत्यादींसारख्या मोठमोठ्या सन्माननीय व्यक्तींची हत्या करावी की न करावी याबद्दल तो विचार करीत होता. यावरून कळून येते की, तो क्रोध, खोटी प्रतिष्ठा किंवा कठोरपणाच्या आहारी गेला नव्हता, म्हणून तो आसुरी वृत्तीचा नव्हता.क्षत्रियांनी शत्रूवर बाण सोडावे ही गोष्ट दैवी समजली जाते आणि अशा कर्तव्यापासून परावृत्त होणे हे आसुरी असल्याचे मानले जाते. यास्तव अर्जुनाला विलाप करावयाचे कोणतेही कारण नव्हते. वर्णाश्रम धर्माच्या नियामक तत्त्वांचे पालन करणारी कोणतीही व्यक्ती दैवी प्रकृतीमध्ये स्थित असते.

« Previous Next »