No edit permissions for मराठी

TEXT 15

anudvega-karaṁ vākyaṁ
satyaṁ priya-hitaṁ ca yat
svādhyāyābhyasanaṁ caiva
vāṅ-mayaṁ tapa ucyate

अनुद्वेग-करम्-क्षुब्ध न करणारे; वाक्यम्-शब्दः सत्यम्-सत्य; प्रिय-प्रिय; हितम्‌-हितकारक; -सुद्धा; यत्-जे; स्वाध्याय-वेदाध्ययनाचे; अभ्यसनम्-अभ्यास; -सुद्धा; एव-निश्चितपणे; वाक्-मयम्-वाचिक, तपः-तपस्या; उच्यते-म्हटले जाते.

सत्य, प्रिय, हितकारक आणि इतरांना क्षेब्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेदपठण करणे यांना वाचिक तप असे म्हणतात.

तात्पर्य: इतरांचे मन क्षुब्ध होईल असे शब्द मनुष्याने बोलू नये. अर्थात गुरू आपल्या शिष्याला उपदेश देण्याकरिता सत्य बोलू शकतात. परंतु अशा गुरुंनी आपले शिष्य नसलेल्यांना त्यांचे मन क्षुब्ध होईल अशा रीतीने बोलू नये. ही वाचिक तपस्या आहे. याव्यतिरिक्त मनुष्याने निरर्थक बोलू नये. शास्त्रसंमत बोलणे हीच आध्यात्मिक क्षेत्रातील बोलण्याची पद्धती आहे. मनुष्य जे सांगतो त्याच्या पुष्टीकरिता शास्त्रातील प्रमाणे तात्काळ त्याने उद्‌धृत केली पाहिजे. त्याच वेळी असे बोलणे हे कर्णमधुर होते. अशा आध्यात्मिक चर्चाद्वारे मनुष्याला सर्वोच्च लाभप्राप्ती होऊ शकते व यामुळे तो समाजाची उन्नती करू शकतो. वेद हे अमर्याद आहेत आणि मनुष्याने त्यांचे अध्ययन करणे आवश्यक आहे. यालाच वाचिक तप असे म्हटले जाते.

« Previous Next »