No edit permissions for मराठी

TEXT 18

satkāra-māna-pūjārthaṁ
tapo dambhena caiva yat
kriyate tad iha proktaṁ
rājasaṁ calam adhruvam

सत्-कार-सत्कार; मान-मान; पूजा-आणि पूजा; अर्थम्-च्या साठी; तपः-तप; दम्भेन-दंभाने; -सुद्धा; एव-निश्चितपणे; यत्-जे; क्रियते-केले जाते; तत्-ते; इह-या जगामध्ये; प्रोक्तम्—म्हटले जाते, राजसम्—राजसिक गुणामध्ये; चलम्—अस्थिर, अध्रुवम्—क्षणिक.

सत्कार, मान आणि पूजा व्हावी म्हणून दंभाने जे तप केले जाते त्या तपाला राजसिक तप असे म्हणतात. अशी तपे अस्थिर तसेच क्षणिक असतात.

तात्पर्य: कधी कधी लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्याकडून पूजा, मानसन्मान, सत्कार प्राप्त व्हावा म्हणून तपस्या केली जाते. रजोगुणी व्यक्ती, आपल्या अधीन असलेल्या लोकांकडून आपले पूजन होण्याची, धनार्पण करून घेण्याची आणि आपले पाय धुऊन घेण्याची व्यवस्था करतात. तपाचे आचरण करून अशा प्रकारच्या ज्या कृत्रिम योजना केल्या जातात, त्या राजस समजल्या जातात. त्यांची फले क्षणिक असतात आणि ही फले काही काळापुरती टिकून राहतात. परंतु ती स्थायी नसतात.

« Previous Next »