No edit permissions for मराठी

TEXT 24

tasmād oṁ ity udāhṛtya
yajña-dāna-tapaḥ-kriyāḥ
pravartante vidhānoktāḥ
satataṁ brahma-vādinām

तस्मात्-म्हणून; -ॐकारापासून प्रारंभ करून; इति-याप्रमाणे; उदाहत्य-निर्देश करून; यज्ञ-यज्ञाचा; दान-दान; तपः-आणि तप; क्रियाः-क्रिया; प्रवर्तन्ते- प्रारंभ करतात; विधानउक्ताः-शास्त्रोक्त; सततम्—सतत; ब्रह्म-वादिनाम्-ब्रह्मवादी,

म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी, शास्त्रोक्त विधिविधानांनुसार यज्ञ, दान आणि तप करणारे ब्रह्मवादी, या सर्व क्रियांचा ॐकारापासून आरंभ करतात.

तात्पर्य: ॐ तद् विष्णो: परमं पदम् (ऋग्वेद १,२२,२०) श्रीविष्णूंचे चरणकमल म्हणजे भक्तियोगाचे परमोच्च परिपूर्ण सार आहे. भगवंतांप्रीत्यर्थ सर्व कर्म केल्याने सर्व कर्माची निश्चितपणे परिपूर्णता होते.

« Previous Next »