No edit permissions for मराठी
TEXT 8
āyuḥ-sattva-balārogya-
sukha-prīti-vivardhanāḥ
rasyāḥ snigdhāḥ sthirā hṛdyā
āhārāḥ sāttvika-priyāḥ
आयुः-आयुष्य; सत्त्व-अस्तित्व; बल-बलः आरोग्य-आरोग्य; सुख-सुख; प्रीति-आणि संतोष; विवर्धनाः-वृद्धी करणारे;रस्याः-रसयुक्त; स्निग्धाः-स्निग्ध; स्थिराः—टिकणारे किंवा स्थिर राहणारे; हृद्या:-हृदय संतुष्ट करणारे; आहारा:-आहार; सात्विक-सत्त्वगुणी मनुष्याला; प्रियाः-प्रिय.
सत्त्वगुणी मनुष्यांना प्रिय असणारा आहार, त्यांचे आयुष्य वृद्धिंगत करतो, जीवनशुद्धी करतो आणि बल, आरोग्य, सुख आणि संतोष प्रदान करतो. असा आहार, रसयुक्त,स्निग्ध, पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो.