No edit permissions for मराठी

TEXT 15

śarīra-vāṅ-manobhir yat
karma prārabhate naraḥ
nyāyyaṁ vā viparītaṁ vā
pañcaite tasya hetavaḥ

शरीर-शरीराने; वाक्-वाणी; मनोभिः -आणि मनः; यत्-जे; कर्म-कर्म; प्रारभते-आरंभितो; नरः-मनुष्य; न्याय्यम्-न्याय्य; वा-अथवा; विपरीतम्-विपरीत, (न्याय्याच्या विरुद्ध); वा-अथवा; पत्र-पाच; एते-ही; तस्य-त्यांची; हेतवः -कारणे.

शरीराने, वाणीने किंवा मनाने न्याय्य किंवा त्याच्या विपरीत असे जे काही कर्म मनुष्य करतो ते या पाच कारणांमुळे घडत असते.

तात्पर्य: या श्लोकातील न्याय्य (योग्य) आणि त्याच्या विपरीत (अयोग्य) हे शब्द महत्वपूर्ण आहेत. योग्य कार्य, शास्त्रांत दिलेल्या आदेशानुसार केले जाते आणि अयोग्य कार्य शास्त्रांचा आदेश न जुमानता केलेले असते. परंतु जे काही कर्म केले जाते त्या कर्माच्या पूर्णतेकरिता ही पाच कारणे आवश्यक आहेत.

« Previous Next »