TEXT 49
asakta-buddhiḥ sarvatra
jitātmā vigata-spṛhaḥ
naiṣkarmya-siddhiṁ paramāṁ
sannyāsenādhigacchati
असत-बुद्धिः-आसक्तीरहित बुद्धी असलेला; सर्वत्र-सर्वत्र; जित-आत्मा-मनावर नियंत्रण असणारा; विगत-स्पृहः-निःस्पृह अर्थात भौतिक कामना नसलेला; नैष्कर्म्य-सिद्धिम्-निष्कर्माची सिद्धी; परमाम्'-परम; सन्यासेन-संन्यासाने; अधिगच्छति-मनुष्य प्राप्त करतो.
जो आत्मसंयमी, अनासक्त आहे आणि जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो.
तात्पर्य: वास्तविक संन्यास म्हणजे आपण भगवंतांचे अंश आहोत व त्यामुळे आपल्याला आपल्या कर्मफलांचा उपभोग घेण्याचा मुळीच अधिकार नाही हे जाणणे होय. जीव हा भगवंतांचा अंश असल्यामुळे त्याच्या कर्माच्या फळांचा उपभोग भगवंतांनीच घेतला पाहिजे. हीच वास्तविक कृष्णभावना होय. कृष्णभावनाभावित कर्म करणारा मनुष्य खरोखरच संन्यासी असतो. अशा भावनेमुळे मनुष्य संतुष्ट राहतो, कारण तो वास्तविकपणे भगवंतांप्रीत्यर्थच कर्म करीत असतो, याप्रमाणे तो कोणत्याही भौतिक गोष्टीवर आसक्त नसतो, भगवत्सेवेद्वारे प्राप्त होणा-या आनंदाव्यतिरित इतर कोणत्याही गोष्टीत आनंदप्राप्ती करण्याचा प्रयत्न तो करीत नाही. संन्याशाने आपल्या पूर्वकर्मांपासून मुक्त असले पाहिजे. परंतु जो कृष्णभावनाभावित मनुष्य असतो त्याला या मुक्तीची अवस्था, तथाकथित संन्यासाश्रमाचा स्वीकार न करताही प्राप्त होते. मनाच्या या अवस्थेलाच योगारुढ अवस्था असे म्हटले जाते. तिस-या अध्यायात ही गोष्ट प्रमाणित केली आहे, यस्त्वात्मरतिरेव स्यात्-जो मनुष्य स्वतःमध्येच तृप्त असतो त्याला आपल्या कर्माच्या फळाचे कोणत्याही प्रकारचे भय नसते.