No edit permissions for मराठी

TEXT 50

siddhiṁ prāpto yathā brahma
tathāpnoti nibodha me
samāsenaiva kaunteya
niṣṭhā jñānasya yā parā

सिद्धिम्-सिद्धी; प्राप्तः-प्राप्त करून; यथा-ज्याप्रमाणे; ब्रह्म-ब्रह्म; तथा-तथा; आप्नोति-प्राप्त करतो; निबोध-जाणण्याचा प्रयत्न कर; मे-माझ्याकडून; समासेन-संक्षेपरूपाने; एव-निश्चितपणे; कौन्तेय-हे कौंतेय; निष्ठा-अवस्था; ज्ञानस्य-ज्ञानाची; या-जी; परा-दिव्य.

हे कोंतेया! ज्या मनुष्याने या सिद्धीची प्राप्ती केली आहे तो सर्वोच्च ज्ञानाची परमसिद्धावस्था, अर्थात ब्रह्मावस्था कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो ते माझ्याकडून जाण. याचे आता मी तुला संक्षेपाने वर्णन करून सांगतो.

तात्पर्य: केवळ भगवंतांकरिताच आपले नियत कर्तव्यकर्म केल्याने मनुष्याला परमसिद्धावस्था कशी प्राप्त करता येते, ते भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. भगवंतांच्या संतुष्टीप्रीत्यर्थ केवळ आपल्या कर्मफलांचा त्याग केल्याने मनुष्याला परमोच्च परिपूर्ण ब्रह्मावस्था प्राप्त होते. हाच आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे. विशुद्ध कृष्णभावनेची प्राप्ती करण्यामध्येच ज्ञानाची पूर्णावस्था आहे आणि याचेच वर्णन पुढील श्लोकांमध्ये करण्यात आले आहे.

« Previous Next »