TEXT 56
sarva-karmāṇy api sadā
kurvāṇo mad-vyapāśrayaḥ
mat-prasādād avāpnoti
śāśvataṁ padam avyayam
सर्व-सर्व, कर्माणि-कर्मे, अपि-जरी, सदा-सदैव, कुर्वाणः-करीत असताना; मत्व्यपाश्रयः-माइया आश्रयाखाली; मत्-प्रसादात्—माइया कृपेने; अवाप्नोति—प्राप्त करतो; शाश्वतम्-शाश्वत; पदम्-धाम; अव्ययम्-अविनाशी
माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी माझ्या आश्रयाखाली, माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाची प्राप्ती होते.
तात्पर्य: मद्-व्यापाश्रयः म्हणजे भगवंतांच्या आश्रयाखाली होय. भौतिक कल्मषांतून मुक्त होण्यासाठी शुद्ध भक्त, भगवंतांच्या किंवा भगवंतांच्या प्रतिनिधीच्या, अर्थात आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली कर्म करतो. शुद्ध भक्तासाठी कालमर्यादेचे बंधन नसते. तो सदैव केवळ भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कर्म करण्यात संलग्न झालेला असतो. याप्रमाणे जो भक्त कृष्णभावनेमध्ये अशा रीतीने संलग्न झालेला असतो त्याच्याविषयी भगवंत अत्यंत दयाळू असतात. कितीही संकटे असली तरी शेवटी त्याला दिव्य धामाची, अर्थात कृष्णलोकाची प्राप्ती होते. त्याचा कृष्णलोकामधील प्रवेश निश्चित असतो यात काही संदेह नाही. त्या परम धामामध्ये परिवर्तनाचा प्रश्नच उद्भवत नाही. तेथील सर्व काही सच्चिदानंदमय असते