TEXT 64
sarva-guhyatamaṁ bhūyaḥ
śṛṇu me paramaṁ vacaḥ
iṣṭo ’si me dṛḍham iti
tato vakṣyāmi te hitam
सर्व-गुह्य-तमम्-परमगुह्य; भूय:-पुन्हा; श्रृणु-ऐक; मे-माझ्याकडून; परमम्-परम किंवा सर्वश्रेष्ठ; वचः-आदेश किंवा वचन; इष्टः असि-तू प्रिय आहेस; मे-मला; दृढम्-अतिशय; इति-याप्रमाणे; ततः-म्हणून; वक्ष्यामि-मी सांगतो; ते-तुझ्या; हितम्-हितार्थ.
तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे मी तुला सर्वज्ञानामधील अत्यधिक गुह्यातर असे परमश्रेष्ठ वचन सांगतो. हे तुझ्या हितार्थ आहे म्हणून ते माझ्याकडून ऐक.
तात्पर्य: भगवंतांनी प्रथम अर्जुनाला गुह्य ज्ञान (ब्रह्मज्ञान) सांगितले आणि नंतर त्याहूनही अधिक गुह्यज्ञान (अंतर्यामी परमात्म्याचे ज्ञान) सांगितले आणि आता ते त्याला परमगुह्य ज्ञान सांगत आहेत की, पुरुषोत्तम भगवंतांना शरण जा. नवव्या अध्यायाच्या शेवटी भगवंत म्हणतात की, मन्मना: 'सदैव माझेच चिंतन कर' या भगवद्गीतेमधील उपदेशांच्या तथ्यावर जोर देण्याकरिता त्याच उपदेशाची या ठिकाणी पुन्हा पुनरावृत्ती करण्यात आली आहे. कोणीही साधारण मनुष्य भगवद्गीतेचे सार जाणू शकत नाही; परंतु जो श्रीकृष्णांचा वास्तविक अत्यंत प्रिय शुद्ध भक्त आहे तोच केवळ गीतेचे सार जाणू शकतो. संपूर्ण वेदांमधील हा अत्यंत महत्वपूर्ण उपदेश आहे. या संदर्भात श्रीकृष्ण जे सांगत आहेत ते ज्ञानाचे अत्यंत महत्वपूर्ण असे सार आहे आणि याचे अनुसरण केवळ अर्जुनानेच नव्हे तर सर्व जीवांनी केले पाहिजे.