No edit permissions for मराठी

TEXT 11

śrī-bhagavān uvāca
aśocyān anvaśocas tvaṁ
prajñā-vādāṁś ca bhāṣase
gatāsūn agatāsūṁś ca
nānuśocanti paṇḍitāḥ

श्री-भगवान उवाच - श्रीभगवान म्हणाले; अशोच्यान् - जे शोक करण्यास योग्य नाही; अन्वशोच:- तू शोक करीत आहेस; त्वम्-तू; प्रज्ञा-वादान्- पांडित्यपूर्ण बोलणी; -सुद्धा; भाषसे-तू बोलतोस; गत- मुकलेल्या, गेलेल्या; असून्-प्राण; अगत- न गेलेल्या; असून्- प्राण; -सुद्धा; -कधीच नाही; अनुशोचन्ति-शोक करतात; पण्डिता:- पंडित किंवा ज्ञानी लोक.

पुरूषोत्तम श्रीभगवान म्हणाले: पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल शोक करीत आहेस. जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच मृतांबद्दलही शोक करीत नाही.

तात्पर्य : भगवंतांनी तात्काळ गुरूपद स्वीकारले आणि आपल्या शिष्याला अप्रत्यक्षपणे मूर्ख म्हणून खडसावले. भगवंत म्हणाले की,‘‘तू एखाद्या विद्वानाप्रमाणे बोलत आहेस, पण तू जाणत नाहीस की, जो विद्वान आहे किंवा ज्याला शरीर आणि आत्म्याचे ज्ञान आहे तो जीविताबद्दल किंवा मृतावस्थेबद्दल शोक करीत नाही.’’ पुढील अध्यायांमध्ये सांगितल्याप्रमाणे जड व चेतन आणि उभयतांच्या नियंत्रकाला जाणणे म्हणजेच ज्ञान होय. राजकारण आणि समाजशास्त्र यांच्यापेक्षा धार्मिक तत्त्वांना अधिक प्राधान्य देण्यात यावे असा अर्जुनाचा युक्तिवाद होता, पण त्याला माहीत नव्हते की, धार्मिक तत्त्वांपेक्षाही जड प्रकृती, आत्मा आणि परमात्मा याबद्दलचे ज्ञान हे अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि या ज्ञानाच्या अभावामुळे त्याने महान विद्वान व्यक्तीचा आव आणायला नको होता. या शरीराचा जन्म झाला आहे आणि आज ना उद्या निश्चितपणे याचा नाश होणारच आहे, म्हणून आत्म्याइतके हे शरीर महत्वपूर्ण नाही, हे जो जाणतो तोच खरा पंडित आहे आणि भौतिक शरीराची कोणतीही स्थिती त्याच्या शोकास कारणीभूत हो नाही.

« Previous Next »