No edit permissions for मराठी

TEXT 19

ya enaṁ vetti hantāraṁ
yaś cainaṁ manyate hatam
ubhau tau na vijānīto
nāyaṁ hanti na hanyate

:-जो कोणी; एनम् - याला; वेत्ति - जाणतो; हन्तारम् -हत्या करणारा; :- जो कोणी; -सुद्धा; एनम् - याला; मन्यते - मानतो; हतम् -मारला गेलेला; उभी-दोघे; तौ- ते दोघे; -कधीच नाही; विजानीत:- जाणतात; -कधीच नाही; अयम्-हे; हन्ति- मारतो; -नाही; हन्यते - मारला जातो.

ज्याला वाटते की, जीवात्मा हा मारणारा आहे किंवा तो मारला जातो, तो अज्ञानात आहे कारण जीवात्मा मारीत नाही किंवा मारलाही जात नाही.

तात्पर्य : जेव्हा एखाद्या शरीरधारी जीवाला प्राणघातक शस्त्रांनी दुखापत केली जाते तेव्हा त्या शरीरातील आत्मा मारला जात नाही हे समजून घेतले पाहिजे. पुढील अनेक श्‍लोकांवरून कळून येईल की, जीवात्मा हा अत्यंत सूक्ष्म असल्याने कोणत्याही भौतिक शस्त्राने त्याची हत्या करणे शक्य नाही आणि त्याच्या आध्यात्मिक स्वरुपामुळे तो मारलाही जाऊ शकत नाही. ज्याची हत्या होते किंवा ज्याची हत्या झाली असे समजले जाते ते केवळ शरीरच असते. तथापि, ही गोष्ट शरीराच्या हत्येला मुळीच उत्तेजना देत नाही. मा हिंस्यात् सर्वा भूतानि - कोणाचीही हिंसा करू नका, हा वैदिक आदेश आहे. तसेच जीवात्मा मारला जात नाही ही समजूत पशुहत्येलाही प्रोत्साहन देत नाही. कोणाच्याही शरीराची अधिकाराविना हत्या करणे हे निंदनीय आहे तसेच हे राष्ट्राच्या आणि भगवंतांच्या दंडसंहितेनुसार निश्चितच दंडनीय आहे. तरीही अर्जुनाला केवळ लहरीखातर नव्हे तर धर्मतत्वाकरिता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आले होते.

« Previous Next »