TEXT 57
yaḥ sarvatrānabhisnehas
tat tat prāpya śubhāśubham
nābhinandati na dveṣṭi
tasya prajñā pratiṣṭhitā
य:-जो; सर्वत्र- सर्वत्र; अनभिस्नेह:- स्नेहरहित; तत्-ते; प्राप्य- प्राप्त झाल्यावर; शुभ-शुभ; अशुभम्-अशुभ किंवा वाईट; न-कधीही नाही; अभिनन्दति-स्तुत; न- कधीच नाही; द्वेष्टि- द्वेष करतो; तस्य - त्याची; प्रज्ञा- पूर्ण ज्ञान; प्रतिष्ठिता -दृढ
या भौतिक जगतात जो काणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या स्तुती अथवा निंदाही करीत नाही, तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो.
तात्पर्य : या भौतिक जगतामध्ये नेहमी काही तरी उलथापालथ होतच असते व अशी ही उलथापालथ चांगली अथवा वाईटही असू शकते. जो अशा या भौतिक उलथापालथीमुळे क्षुब्ध होत नाही किंवा जो शुभाशुभ गोष्टींपासून निर्विकार राहतो तो कृष्णभावनेत दृढपणे स्थिर झाला आहे असे जाणावे. जोपर्यंत मनुष्य भौतिक जगात आहे तोपर्यंत नेहमी शुभाशुभ गोष्टी घडण्याची शक्यता असते. कारण हे जग पूर्णपणे द्वंद्वांनी भरले आहे, पण जो कृष्णभावनेत स्थिर झाला आहे तो शुभाशुभ गोष्टींपासून विचलित होत नाही, कारण त्याचा सर्व मंगलदायी भगवान श्रीकृष्णांशी संबंध असतो. अशा कृष्णभावनेमुळे एखादा परिपूर्ण अशा दिव्य स्तरावर आरुढ होतो व या स्तरालाच समाधि म्हटले जाते.