No edit permissions for मराठी

TEXT 59

viṣayā vinivartante
nirāhārasya dehinaḥ
rasa-varjaṁ raso ’py asya
paraṁ dṛṣṭvā nivartate

विषया:- इंद्रियोपभोगाचे विषय; विनिवर्तन्ते- यांच्यापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला जातो; निराहारस्य-निषेधात्मक बंधनाचे पालन करून; देहिन:- देहधारी जीवासाठी; रस-वर्जम्- गोडी सोडून दिल्याने; रस:- उपभोगाची आवड; अपि-जरी असली तरी; अस्य-त्याची; परम्- अतिशय श्रेष्ठ गोष्टींचा; दृष्ट्वा- अनुभव आल्यावर; निवर्तते- तो पूर्णपणे परावृत्त होतो.

देहधारी जीवात्मा जरी इंद्रियोपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रियविषयांबद्दलची गोडी राहतेच, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्ये थांबविल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो.

तात्पर्य: मनुष्य जोपर्यंत दिव्य स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो इंद्रियतृप्तीपासून पूर्णपणे परावृत्त होऊ शकत नाही. विधिनांद्वारे इंद्रियोपभोगापासून निवृत्त होण्याची पद्धती ही काहीशी, रोगी मनुष्याने विशिष्ट खाद्यपदार्थापासून पथ्य पाळण्याप्रमाणे आहे. पण रोग्याला अशी बंधनेही आवडत नाहीत आणि त्याची खाद्यपदार्थामधील रूचीही नाहीशी होत नाही. त्याचप्रमाणे अष्टांगयोगासारखे काही अध्यात्मिक मार्ग, ज्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान इत्यादी येतात हे ज्या व्यक्तींना श्रेष्ठ ज्ञान नाही अशा अल्पबुद्धी लोकांसाठी आहे. परंतु आपल्या कृष्णभावनेच्या प्रगतीत ज्या व्यक्तीने भगवान श्रीकृष्णांच्या अप्रतिम सौंदर्याची गोडी चाखली आहे त्याला निर्जीव भौतिक गोष्टींविषयी मुळीच गोडी राहात नाही. म्हणून जीवनातील आध्यात्मिक प्रगतिपथावर असणाऱ्या अल्पबुद्धी नवसाधक व्यक्तीसाठी बंधने असतात. परंतु अशी बंधने जोपर्यंत एखाद्याची कृष्णभावनेमध्ये वास्तविक गोडी निर्माण होत नाही तोपर्यंतच केवळ चांगली आहेत. जेव्हा एखादा खऱ्या अर्थाने कृष्णभावनाभावित होतो तेव्हा त्याची आपोआपच अशा निरर्थक गोष्टींमधील गोडी कमी होते.

« Previous Next »