No edit permissions for मराठी

TEXT 63

krodhād bhavati sammohaḥ
sammohāt smṛti-vibhramaḥ
smṛti-bhraṁśād buddhi-nāśo
buddhi-nāśāt praṇaśyati

क्रोधात् - क्रोधापासून; भवति-निर्माण होतो; सम्मोह:- पूर्ण मोह किंवा संमोह; सम्मोहात्- मोहापासून; स्मृति- स्मृतीचा; विभ्रम:- गोंधळ; स्मृति-भ्रंशात्- स्मृतिभ्रंश झाल्यावर किंवा स्मृतीत गोंधळ झाल्यानंतर; बुद्धि-नाश:- बुद्धीचा नाश; बुद्धि-नाशात् - आणि बुद्धीचा नाश झाल्यानंतर; प्रणश्यति- मनुष्याचे पतन होते.

क्रोधापासून संमोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते.

तात्पर्य : श्रील रुप गोस्वामींनी (भक्तिरसामृतसिंधु 1.2.258) आपल्याला सांगितले आहे.

प्रापञ्जिकतया बुद्धया हरिसम्बन्धि वस्तुन:।
मुमुक्षुभि: परित्यागो वैराग्यं फल्गु कथ्यते ॥

(भक्तिरसामृतसिंधु 1.2.258)

     कृष्णभावनेच्या विकासामुळे समजू शकते की, प्रत्येक गोष्टीचा भगवंतांच्या सेवेमध्ये उपयोग होऊ शकतो. ज्यांना कृष्णभावनेचे ज्ञान नाही ते कृत्रिमरीत्या भौतिक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करततात आणि परिणामी जरी त्यांना भौतिक बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असली तरी ते वैराग्याची पूर्णवस्था प्राप्त करू शकत नाहीत. त्यांच्या या तथाकथित वैराग्याला फल्गु किंवा गौण म्हटले जाते. यालट कृष्णभावनाभावित मनुष्याला प्रत्येक गोष्टीचा उपयोग  भगवतसेेवेमध्ये कसा करावा याचे ज्ञान असते. म्हणून तो भौतिक भावनेला बळी पडत नाही. उदाहरणार्थ, निर्विशेषवादी मनुष्याच्या दृष्टीने भगवंत किंवा परम सत्य हे निर्विशेष असल्यामुळे अन्न ग्रहण करू शकत नाही. निर्विशेषवादी चांगले अन्नपदार्थ खाण्याचे टाळतो तर भक्त जाणतो की, श्रीकृष्ण हे पमरभोक्ता आहेत आणि त्यांना भक्तिभावाने अर्पण केलेले सर्व काही ते ग्रहण करतात. म्हणून उत्तम अन्नपदार्थ भगवंताला अर्पण केल्यानंतर भक्त ते शेष अन्न ‘प्रसादम्’ म्हणून ग्रहण करतो. याप्रमाणे सर्व गोष्टींना आध्यात्मिक स्वरुप प्राप्त होते आणि यामुळे पतनाचा धोका नाहीसा होतो. भक्त हा कृष्णभावनेमध्ये त्याच्या कृत्रिम तथाकथित वैराग्यामुळे जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही आणि याच कारणास्तव मनाच्या यत्किंचित विचलनामुळेही त्याचे भौतिक अस्तित्वाच्या जंजाळात पुन्हा पतन होते. असे म्हटले आहे की, असा जीव जरी मोक्षाच्या अंतिम स्तरावर पोचला तरी त्याला भक्तिपूर्ण सेवेचा आधार नसल्यामुळे त्याचे पतन होते.

« Previous Next »