No edit permissions for मराठी

TEXT 64

rāga-dveṣa-vimuktais tu
viṣayān indriyaiś caran
ātma-vaśyair vidheyātmā
prasādam adhigacchati

राग-आसक्ती; द्वेष- आणि अनासक्ती; विमुक्तै:- यापासून जो मुक्त झाला आहे तो; तु- परंतु; विषायान् - इंद्रियविषय; इन्द्रियै:- इंद्रियांनी; चरन्- वावारणारा; आत्म-वश्यै:- स्वत:च्या नियंत्रणात असलेल्या; विधेय-आत्मा-नियमित स्वातंत्र्याला अनुसरणारा; प्रसादम्- भगवंतांची कृपा; अधिगच्छति- प्राप्त करतो.

पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्त्वांनुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकते.

तात्पर्य: यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे की, एखादा कृत्रिम पद्धतीने बाह्यत: इंद्रियांचे नियंत्रण करू शकेल, पण जोपर्यंत इंद्रिये भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही क्षणी पतन होण्याचा संभव असतो. पूर्णपणे कृष्णभावनाभावित असलेला मनुष्य जरी वरकरणी दिसण्याला विषयी स्तरावर असला तरी तो कृष्णभावनाभावित असल्याकारणाने त्याला विषयी कर्मामध्ये आसक्ती नसते. कृष्णभावनाभावित मनुष्याला केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीमध्ये आस्था असते आणि इतर कशाचीही इच्छा असेल तर सामान्यत: अनावश्यक असणारी कोणतीही गोष्ट भक्त करू शकतो आणि श्रीकृष्णांची इच्छा नसेल तर तो असे कधीही करणार नाही की, जे सामान्यत: त्याने आपल्या तृप्तीकरिता केले असते. म्हणून कर्म करणे अथवा न करणे हे त्याच्या अधीन आहे, कारण तो केवळ श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनानुसारच कार्य करीत असतो. ही भावना म्हणजे भगवंतांची अहैतुकी कृपाच आहे. भक्त हा जरी वैषयिक स्तरावर आसक्त असला तरी तो या अहैतुकी कपेची प्राप्ती करू शकतो.

« Previous Next »