No edit permissions for मराठी

TEXT 2

vyāmiśreṇeva vākyena
buddhiṁ mohayasīva me
tad ekaṁ vada niścitya
yena śreyo ’ham āpnuyām

व्यामिश्रेण - संदिग्ध किंवा दुटप्पी बोलण्याने; इव-निश्चितपणे; वाक्येन-बोलण्याने; बुद्धिम्- बुद्धी; मोहयसि-तुम्ही मोहित करीत आहोत; इव - निश्चितपणे; मे -माझ्या; तत्- म्हणून; एकम्- केवळ एक; वद-कृपया सांगा; निश्चित्य-निश्चितपणे; येन-ज्यामुळे; श्रेय:-खरे हित किंवा वास्तविकपणे श्रेयस्कर; अहम्-मी; आप्नुयाम्- प्राप्त करेन.

तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे. म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टींनी श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा.

तात्पर्य: यापूर्वीच्या अध्यायात भगवद्गीतेचे प्रास्ताविक निवेदन म्हणून सांख्ययोग, बुद्धियोग, बुद्धीद्वारे इंद्रियनिग्रह, निष्काम कर्म आणि नवसाधकाची स्थिती इत्यादी विविध मार्गांचे वर्णन करण्यात आले आहे, पण या सर्वांची मांडणी पद्धतशीरपणे करण्यात आली नव्हती म्हणून आकलन किंवा बोध होण्यासाठी आणि आचरण करण्यासाठी या मार्गांची सुसंबद्ध मांडणी आवश्यक होती. यास्तव वरकरणी गोंधळात टाकणाऱ्या या गोष्टींचे स्पष्टीकरण अर्जुनाला हवे होते, ज्यामुळे सर्वसाधारण लोकही विपऱ्यास न करता त्यांचा स्वीकार करू शकतील. शब्दांची फसवणूक करून अर्जुनाला गोंधळात टाकावे हा जरी श्रीकृष्णांचा उद्देश नव्हता तरी अर्जुनाला कृष्णभावनेची पद्धती म्हणजे निष्क्रियता की सक्रिय सेवा आहे हे समजू शकले नाही. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे भगवद्गीतेचे रहस्य समजून घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यासाठी अर्जुन आपल्या प्रश्‍नांद्वारे कृष्णभानेचा मार्ग मोकळा करीत आहे.

« Previous Next »